728X90

728X90

0

0

0

0

0

0

0

0

0

या लेखात

वय शिथिल करणारा आहार: नेहमी तरुण कसे रहावे
61

वय शिथिल करणारा आहार: नेहमी तरुण कसे रहावे

सजीवांमध्ये  वृद्धत्व ही अपरिहार्य गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार वृद्धत्व हे अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही स्वरूपाचे असते.
आहार: नेहमी तरुण कसे रहावे

तज्ज्ञांच्या मतानुसार, वय शिथिल करणारा आहार कोलेजनचे प्रमाण वाढवून तुम्हाला तरुण आणि उत्साही ठेवतो.

सजीवांमध्ये  वृद्धत्व ही अपरिहार्य गोष्ट आहे. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार वृद्धत्व हे अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही स्वरूपाचे असते. स्नायूंची ताकद, मजबूत रचना, सुदृढ अवयव आणि तेजस्वी त्वचा हे तारुण्याचे लक्षण आहे. वयोमानानुसार या घटकांमध्ये अंतर दिसून येते.

त्वचा हा शरीराचा सर्वात मोठा अवयव आहे आणि ते वृद्धत्वाचे स्पष्ट सूचक आहे. रिद्धिमा बत्रा, क्लिनिकल पोषणतज्ञ आणि न्यूट्रिशन डिफाइंड, नवी दिल्लीच्या संस्थापक हे स्पष्ट करतात की, “वृद्धत्वामुळे त्वचेच्या पेशींचे नुकसान होते. हे आंतरिक घटक (जीन्स) किंवा बाह्य घटकांमुळे (अतिनील किरण, धूम्रपान, अल्कोहोल, वायू प्रदूषण किंवा कुपोषण) असू शकते.”

शालिनी अभिलाष, पोषणतज्ञ, इंस्टाग्रामर आणि बेंगळुरू येथील योग शिक्षिका सांगतात की, “बहुतेकदा त्वचेवर अनुवांशिक प्रवृत्तीपेक्षा बाह्य घटकांचा जास्त प्रभाव पडतो.”

कोलेजनमधील घट: त्वचेच्या वृद्धत्वाचे मूळ कारण आहे.

 यापुढे शालिनी सांगतात की, “कोलेजन हे अमीनो ऍसिड आहे जे वृद्धत्व नियंत्रित करते.  ह्या प्रथिनांवर आधारित ऊती  स्नायू आणि इतर ऊतींना जोडतात . ते त्वचेच्या आण्विक संरचनेला एकत्रित ठेवतात.”

यामध्ये अजून माहिती देताना त्या सांगतात की,  वयाच्या 25 वर्षापर्यंत ते आपल्या सर्व शरीरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. “आणि वयाच्या 25 वर्षांनंतर, कोलेजनचे उत्पादन दरवर्षी 10-15 टक्क्यांनी कमी होते.”

यानंतर रिधिमा स्पष्ट करतात की,  कोलेजन कमी होणे हे एखाद्या व्यक्तीच्या वयानुसार त्वचेवर दिसणाऱ्या बदलांचे मुख्य कारण आहे. धूम्रपान, मद्यपान, अनारोग्यकारक अन्न सवयी, प्रक्रिया केलेले अन्न, जास्त साखरेचे सेवन आणि झोपेची अनियमित पद्धत हे कोलेजन कमी होण्यासाठी काही महत्वाचे घटक आहेत.

झोपेचा अभाव किंवा झोपेच्या वाईट सवयींचा परिणाम म्हणजे अकाली येणाते वृद्धत्व अशी चेतावणीही त्या देतात.

रिधिमा स्पष्ट करतात की, त्वचेवर अकाली वृद्धत्वाची लक्षणे खालील प्रमाणे आहेत:

हायपरपिग्मेंटेशन

  • त्वचा सैल होणे किंवा त्वचेची लवचिकता कमी होणे
  • केस पांढरे होणे किंवा केस गळणे

कोलेजनचे योग्य प्रमाणात उत्पादन म्हणजे अकाली वृद्धत्व न येणे.

कोलेजनचे उत्पादन वाढल्याने अकाली वृद्धत्व येत नाही. अभ्यासाअंती असे समोर आलेले आहे की हे योग्य आहार आणि संतुलित पोषणाद्वारे साध्य केले जाऊ शकते. शालिनी स्पष्ट करतात की, मांस हे एकमेव अन्न आहे ज्यामध्ये कोलेजन असते, परंतु अकाली वृद्धत्व टाळण्यासाठी मांसावर अवलंबून राहणे योग्य नाही. भरपूर फायबरसह वनस्पती-आधारित आहार घेतल्यास कोलेजनचे उत्पादन वाढू शकते.

त्यांच्या मतानुसार, “100 ग्रॅम मांसामध्ये साधारणतः 0.3% कोलेजन असते.”

दाह-विरोधी, अँटिऑक्सिडंट आणि क जीवनसत्व, झिंक, तांबे, सिलिकॉन, ग्लाइसिन, लाइसिन भरपूर असलेले अन्न हे कोलेजन तयार करण्यास मदत करतात.

वृद्धत्व टाळण्यासाठी आहार: यासाठी कोणते जादूचे औषध आहे का?

शालिनी असे विधान करतात आणि या गोष्टीवर भर देतात की, “बहुतेक वनस्पती-आधारित पदार्थांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. “परंतु, काही खाद्यपदार्थ काही मिलिग्रॅम इतक्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि/किंवा फायबरने समृद्ध असतात.” निरोगी जीवनशैलीने तरुणपणाची सुरुवात करणे ही अकाली वृद्धत्वाला दूर ठेवण्याची गुरुकिल्ली आहे.

आशा आर या बेंगळुरूमधील ४२ वर्षीय आयटी प्रोफेशनल आहेत ज्या हॅपीएस्ट हेल्थला सांगतात की, त्यांनी एका वर्षापासून चांगल्या आरोग्याच्या फायद्यांसाठी आवळ्याचा रस पिण्यास सुरुवात केली. त्या सांगतात की, “मी हा रस सकाळी रिकाम्या पोटी पिते. मला वाटते की, माझी क्षमता वाढलेली आहे. माझी त्वचा देखील एक वर्षापूर्वीच्या तुलनेत निरोगी आणि अधिक चमकदार दिसते आहे.

अकाली वृद्धत्वाला टाळणारे काही पदार्थ पुढील प्रमाणे आहेत:

  • कोरफड

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कोरफडीच्या गरामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. शालिनी सांगतात की, सकाळी कोरफडीचा गर  खाल्ल्यास त्याच उत्तम फायदा होतो. संपूर्ण पोषणासाठी शेवग्याची  पाने, गव्हांकुर आणि बर्म्युडा गवत यापासून बनवलेले इतर वनस्पती-आधारित रसांचे देखील सेवन केले पाहिजेत असे त्या सुचवितात.

  • क्रूसिफेरस भाज्या

रिधिमा सांगतात की, ब्रोकोली, ब्रुसेल्स स्प्राउट्स, कोबी आणि इतर पालेभाज्या या अँटिऑक्सिडंट आणि दाह-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असतात. हे सल्फ्युरेट आणि आयसोथिओसायनेट असतात,  क्रूसिफेरस भाज्यांमध्ये आढळणारी सेंद्रिय रसायने असतात जी अँटीऑक्सिडंटचे मिळणारे प्रतिसाद सक्रिय करतात.

  • मशरूम

मशरूममध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. तथापि, शालिनी पुढे सांगते की, एलर्जी सारखे परिणाम टाळण्यासाठी मशरूम फक्त शिजवलेल्या स्वरूपातच खाणे आवश्यक आहे. “आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा त्याचा मर्यादित वापर करा.”

  • आवळा

भारतीय गूसबेरी, ज्याला आवळा देखील म्हणतात, हे क जीवनसत्वाने समृद्ध असे फळ आहे. शालिनी पुढे सांगतात की, आवळ्यामध्ये वृद्धत्व विरोधी विशिष्ट गुणधर्म आहे ज्यामुळे कोलेजन उत्पादनास चालना मिळते. याचे शक्यरो सकाळी लवकर सेवन करावे असे ही त्यांनी स्पष्ट केले.

  • डार्क चॉकलेट

कोको बियांपासून बनवलेले डार्क चॉकलेट हे अकाली वृद्धत्व रोखण्यासाठी  नवीन वरदान आहे. अभ्यासाअंती असे दिसून येते की, कोको बिया या अँटिऑक्सिडंट्सने (पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स) समृद्ध आहेत. परंतु प्रक्रिया केल्याने यापैकी बहुतेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म निघून जातात.  शालिनी सचेत करतात की, “डार्क चॉकलेट हे अँटीऑक्सिडंट आहे. पण, त्यामधील चरबी आणि साखरेच्या मात्रेकडे लक्ष द्या.”

“मधुमेह नसलेल्या व्यक्तीने दिवसभरात सहा ते आठ ग्रॅम डार्क चॉकलेट खाल्लेले चालते” असे ही त्या स्पष्ट करतात.

चेन्नईच्या अथुल्या सिनियर केअर, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. सुगन्या एन सांगतात की, सर्व अँटी-एजिंग पदार्थ हे शरीराच्या प्रत्येक भागासाठी चांगले असतात असे नाही. उदाहरणार्थ, हायपोथायरॉईडीझम असलेल्या काही व्यक्तींना क्रूसिफेरस भाज्या पचायला जास्त वेळ लागतो. म्हणून, अशा व्यक्तींनी त्या शिजवलेल्या स्वरूपात खाणे आणि त्याचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे असे डॉ.  सुगन्या सांगतात. प्रिझर्व्हेटिव्ह्ज वापरून दूरच्या ठिकाणाहून आलेले खाद्यपदार्थ खाण्यापेक्षा स्थानिक पातळीवर उपलब्ध शेती उत्पादनांचे सेवन करणे अधिक श्रेयस्कर आहे, असेही त्यांनी सांगितलेले आहे.

समतोल ढासळणे

पोषणतज्ञ स्पष्टपणे सांगतात की, केवळ वृद्धत्वविरोधी पदार्थांचे सेवन केल्याने शरीराचे संतुलन बिघडू शकते. फळे, भाज्या आणि प्रथिने यांसह आहारातील अँटिऑक्सिडंट-समृद्ध पदार्थांचा दररोज किमान चार ते पाच भागांमध्ये खाण्याचा आनंद घेतला पाहिजे, असे रिधिमा  सांगतात.

शालिनी पुढे सांगतात की,  एकाच जेवणात आवश्यक प्रमाणात खाणे हे आव्हानात्मक असते. एका दिवसात तीन ते सहा भागांमध्ये सेवन केल्याने आवश्यक प्रमाण खाण्यास मदत होते. त्या स्पष्ट सांगतात की, “प्रत्येक जेवणात फायबर युक्त 100 ग्रॅम शिजवलेल्या भाज्या या अकाली वृद्धत्वास विलंब करतात.”

अकाली वृध्दत्व विरोधी एक औषध आहे जे मोफत उपलब्ध आहे आणि जास्त वापरले जात नाही ते म्हणजे झोप, शालिनी म्हणतात.

बोध

  • कोलेजन उत्पादनास चालना देणारे पदार्थ वृद्धत्वास विलंब करू शकतात.
  • क्रूसिफेरस भाज्या, मशरूम, डार्क चॉकलेट आणि आवळा हे पदार्थ कोलेजन तयार करू शकतात.
  • निरोगी जीवनशैलीने तरुणपणाची सुरुवात करणे ही अकाली वृद्धत्वाला विलंब करण्याची गुरुकिल्ली आहे.
  • केवळ योग्य आहार आणि पुरेशी झोप न घेतल्याने देखील त्वचेला वृद्धत्व येऊ शकते.

 

तुमचा अनुभव/कमेंट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेडिंग

लेख

लेख
भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.
लेख
आहारात सर्व रंगांची फळे आणि भाज्या, प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट आणि चरबी यांचा समावेश असावा.
लेख
व्यायामामुळे स्त्रियांना हाडांचे आरोग्य राखण्यास आणि हार्मोनल चढउतारांचा सामना करण्यास मदत होते. घरात ४० मिनिटे व्यायाम केल्यास महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहू शकते
लेख
त्वचारोगाची प्राथमिक लक्षणे म्हणजे स्नायूकमकुवतपणा, त्वचेवर पुरळ आणि वेदनादायक फोड.
लेख
आपण दररोज काही पदार्थ खात आहात, ज्यामुळे आपल्या यकृताच्या समस्या वाढत आहेत. त्या यादीत कोणते पदार्थ आहेत?
लेख
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपली हाडे मऊ आणि कमकुवत होतात. प्रौढांमध्ये या अवस्थेला ऑस्टियोमॅलेसिया आणि मुलांमध्ये रिकेटिस म्हणतात.

0

0

0

0

0

0

0

0

0

Opt-in To Our Daily Healthzine

A potion of health & wellness delivered daily to your inbox

Personal stories and insights from doctors, plus practical tips on improving your happiness quotient

Opt-in To Our Daily Healthzine

A potion of health & wellness delivered daily to your inbox

Personal stories and insights from doctors, plus practical tips on improving your happiness quotient
We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.