
सांगली, महाराष्ट्र येथील २९ वर्षांच्या झायबा कौसर (विनंतीनुसार नाव बदलले आहे) या पाच वर्षांपासून गर्भधारणेसाठी प्रयत्न करत होत्या पण त्यांना यश आलेले नव्हते. गर्भधारणेसाठी त्यांनी आणि तिच्या नवऱ्याने त्यांच्या मित्रांच्या सल्ल्यानुसार आयुर्वेदिक उपचार घेण्याचा निर्णय घेतला.
आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रज्ञा अमृत पाटील यांनी या दाम्पत्याच्या पहिल्या भेटीमध्ये सौ. कौसर यांची मासिक पाळी तसेच या जोडप्याची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींबद्दलचा सर्व तपशील गोळा केला आणि रक्त तपासणी, वीर्य विश्लेषण आणि अल्ट्रासाऊंड फॉलिक्युलर करण्याचा सल्ला दिला.
फॉलिक्युलरच्या अभ्यासामध्ये विशेषत: बीजकोश (अंडाशयात सापडलेल्या पिशव्या) जे ओव्हुलेशनचा मागोवा घेतात अशा गर्भाशयाच्या आणि अंडाशयाचे फोटो काढले जातात. कौसर यांच्या अल्ट्रासाऊंड स्कॅनने एनोव्ह्युलेटरी सायकल (ओव्हुलेशनची अनुपस्थिती) पाहता आली आणि त्यांच्या पतीच्या वीर्य विश्लेषणाचे रिपोर्ट नॉर्मल आले. डॉ. प्रज्ञा यांनी प्रामुख्याने कौसर यांचे ओव्हुलेशन सुधारण्यावर करण्यावर लक्ष केंद्रित करणारे उपाय सुचवले.
त्यांचे उपचार एका समुपदेशन सत्राने सुरू झाले ज्यादरम्यान त्यांना खाण्याच्या योग्य सवयी आणि ध्यानासारख्या पद्धतींचा अवलंब करण्यास सांगितले गेले. त्यांना फॉलिक अॅसिड आणि मल्टीविटामिन यांसारख्या सहाय्यक औषधांसह त्यांचे ओव्हुलेशन सुधारण्यासाठी करण्यासाठी वनौषधी घेण्याचा सल्ला दिला. हे औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे पाच महिन्यांनंतर, कौसर यांना गर्भधारणेत यश आले आणि आता त्या त्यांच्या गर्भधारणेच्या शेवटच्या तिमाहीत आहे.
कौसर सांगतात की, डॉक्टरांनी दिलेला सकारात्मक दृष्टिकोन, आशा आणि आत्मविश्वासामुळेच हे शक्य झाले आहे.
गर्भधारणेवरील आयुर्वेदिक दृष्टिकोन
आयुर्वेदिक तज्ञ हे नैसर्गिक गर्भधारणेला प्रोत्साहन देतात. प्रजननक्षमतेमध्ये योगदान देणाऱ्या चार घटकांचा ते विचार करतात:
- वय (ऋतु कला) प्रजननाचे वय आणि प्रजनन कालावधी
- प्रजननाचे आरोग्य (क्षेत्र)
- शुक्राणू आणि बीजांडाची गुणवत्ता (बीज)
- पोषण (अंबू)
या चार घटकांपैकी कोणत्याही कोणत्याही प्रकारचे असंतुलन झाल्यास नैसर्गिकरित्या गर्भधारणा करणे आणि निरोगी संततीचा जन्म यांमध्ये अडचणी येऊ शकतात.
वंध्यत्वाची कारणे
12 महिने किंवा त्याहून अधिक नियमित सुरक्षा न घेता केलेल्या लैंगिक संभोगानंतर गर्भधारणा न होणे अशी जागतिक आरोग्य संस्थेने (WHO) वंध्यत्वाची व्याख्या केलेली आहे. हे ओव्हुलेशनच्या समस्यांमुळे होऊ शकते. याची विविध कारणे आहेत जसे की,
- फॅलोपियन ट्यूबचे आजार (नळीतील अडथळे किंवा दाह)
- गर्भाशयाचे विकार जसे की एंडोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉइड्स
- पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम किंवा फॉलिक्युलर डिसऑर्डर यांसारखे अंडाशयाचे विकार
- लठ्ठपणा आणि थायरॉईड यांसारखे विकार
महिला वंध्यत्व एकतर प्राथमिक (कधीही गरोदर नसणे) किंवा दुसरे (किमान एक गर्भधारणा असणे) अशा प्रकारचे असू शकते.
महिला वंध्यत्वाबद्दल येथे अधिक जाणून घ्या.
आधुनिक पद्धतीने निदान करणाऱ्या साधनांचा वापर करून वैद्यकीयपद्धतीने मूल्यांकन करणे.
आयुर्वेदिक स्त्रीरोग तज्ञ हे स्त्रियांची मासिक पाळी आणि जीवनशैलीचे मूल्यमापन करून ती तणावग्रस्त आहे की नाही याचा अंदाज घेतात आणि त्यानुसार उपचार पद्धतीचे नियोजन करतात, असे उत्तर प्रदेशातील शामली येथील आयुर्वेदिक तज्ञ डॉ प्रिया रोहल यांनी सांगितले आहे.
मुंबईतील डॉ. प्राजक्ताज आयुर्वेद स्त्रीरोग आणि गर्भधारणा केअर क्लिनिकमधील आयुर्वेदिक स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ प्राजक्ता पाटील या वैद्यकीय परिस्थितीचे मूल्यांकन आणि निदान करण्यासाठी आधुनिक पद्धतीने निदान करण्याच्या साधनांचा वापर करतात.
आयुर्वेदिक मार्गदर्शक तत्त्वांनुसार संपूर्ण वैद्यकीय तपासणीनंतरच आम्हाला अत्याधुनिक पद्धतीची निदान करण्याची साधने आणि चाचण्यांकडून मदत मिळणे अपेक्षित आहे असे डॉ प्राजक्ता सांगतात.
व्यवस्थापन योजना
मासिक पाळी आणि प्रजननक्षमतेसाठी वायू (वात) पुनर्संचयित करणे आवश्यक आहे असे मानले जाते. परंतु हे वंध्यत्व प्राथमिक किंवा दुय्यम प्रकारचे आहे यावर आणि कारणावर देखील हे उपचार अवलंबून असतात. समुपदेशन, डिटॉक्स थेरपी, विश्रांती आणि वनौषधी हे व्यवस्थापन योजनेचा एक भाग आहेत जे प्रत्येक व्यक्तीनुसार तयार केले जातात.
समुपदेशन आणि शिक्षण
वंध्यत्वाचे व्यवस्थापन करताना समुपदेशन हे अनिवार्य आहे डॉ. प्राजक्ता सांगतात. 2020 मधील रिव्ह्यू पेपरमध्ये सांगितल्याप्रमाणे मनोवैज्ञानिकांची मदत ही चिंतेची लक्षणे कमी करू शकतात आणि गर्भधारणेच्या संधी वाढवू शकतात.
इराणची कर्मन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस यांनी 2021 मध्ये केलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये वंध्यत्व असलेल्या ६० जोडप्यांवर समुपदेशनामुळे झालेल्या परिणामांचा अभ्यास केला आणि त्यांना असे आढळून आले की, निदान आणि उपचाराच्या वेळेपासून सर्वसमावेशक शिक्षण आणि समुपदेशनाचे उपचार घेत असलेल्या रुग्णांची भावनिक स्थिती सुधारल्याचे स्पष्ट झाले आहे. योग्य त्या उपायांबद्दल उपायांबद्दल जाणून घेऊन अयोग्य जीवनशैलीला सुधारणे हा काहीवेळेस उपचारांचा एक भाग असतो असे डॉ. प्राजक्ता सांगतात.
वैद्यकीय उपचारांचा कालावधी आणि त्या कालावधीत पाळला जाणारा विशिष्ट आहार आणि जीवनशैलीविषयीच्या तपशिलाची वैद्य चर्चा करतात. तसेच हे उपचार सुरु करण्यापूर्वी संबंधित रुग्णाची संमती घेणे आवश्यक असते.
कारणांकडे लक्ष देणे
PCOS किंवा हायपोथायरॉईडीझम सारख्या आजारांकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे आणि त्यानंतर वंध्यत्वावर उपचार केले पाहिजे. ज्या आजारांकडे लक्ष देणे हे दीर्घकालीन काम असते अशावेळी व्यक्तींमध्ये परिणाम दिसून येण्यासाठी अनेकदा विलंब होतो.
पंचकर्म उपचार (डिटॉक्स थेरपी)
जरी प्रत्येक आजारांमध्ये डिटॉक्स थेरपी वापरली जात नसली तरी गर्भधारणेसाठी शरीर तयार करण्यात याची मदत होते. महिलांच्या वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी पंचकर्माव्यतिरिक्त (पाच प्रमुख उपचारपद्धती), उत्तर बस्ती (औषधीयुक्त तूप किंवा तेल गर्भाशयाच्या पोकळीत टाकणे) असे उपचार करण्याची शिफारस केली जाते.
जर कशाचाही परिणाम झाला नाही तर उत्तरबस्तीचा उपचार प्रभावी ठरतो असे डॉ. प्राजक्ता सांगतात.
तोंडाद्वारे वनौषधींमुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ इच्छित परिणाम मिळत नसल्यास त्या वरील उपचारांचा सल्ला देतात.
अभ्यासाअंती विशेषत: फॅलोपियन ट्यूब ब्लॉकेज असलेल्या परिस्थितीमध्ये या उपायांचा प्रभाव दिसून येतो. जामनगर, गुजरात येथील इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट टीचिंग अँड रिसर्च आयुर्वेद यांनी केलेल्या एका छोट्या अभ्यासात उत्तर बस्ती हा ट्यूबमधील ब्लॉकेजवर प्रभावी आणि कोणत्याही गुंतागुंतीशिवाय असलेला उपचार असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
वनौषधींच्या सूत्रीकरणाची भूमिका
आयुर्वेदिक तज्ञ हे वंध्यत्वावरील उपचारासाठी औषधी वनस्पती आणि पॉली-हर्बल फॉर्म्युलेशन वापरण्याचा सल्ला देतात. डॉ. सुशीला चौधरी आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद, जयपूरच्या यांच्या टीमने २०२१ च्या केस स्टडीमध्ये दोन वर्षे व्यंधत्वाशी सामना करणाऱ्या 29 वर्षांच्या मुलीमध्ये PCOS मुळे प्राथमिक वंध्यत्व आलेले आहे असे आढळले. तिला शतपुष्प चूर्ण (अनेथम सोवा किंवा बडीशेपच्या बियांची पावडर) आणि फलसर्पी (20 घटकांसह तुपावर आधारित सूत्रीकरण) अशा दोन वनौषधींची मात्रा दिली. ही औषधांची मात्रा दोन महिन्यांच्या कालावधीसाठी दिली गेली होती त्यानंतर त्या मुलीला नैसर्गिकरित्या गर्भधारणा करण्यास शक्य झाले.
दुसर्या केस स्टडीमध्ये वंध्यत्वाशी आठ वर्षे सामना केलेल्या 30 वर्षीय महिलेला 16 आठवड्यांसाठी वनौषधी औषधांसह पंचकर्म उपचार देण्यात आले आणि त्यानंतर त्या गर्भधारणा करू शकल्या.
मोठ्या जनसमुदायासाठी वैद्यकीय चाचण्या आयोजित करण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत. पण डॉक्युमेंटेशन आणि अहवालाच्या अभावामुळे हे अभ्यास सार्वजनिक डोमेनमध्ये प्रकाशित केले गेले नाहीत असे तज्ञ सांगतात.
आयुर्वेदिक उपचारांच्या व्यवस्थापनामध्ये जनजागृतीचा अभाव आहे.
डॉ. प्राजक्ता सांगतात की, आयुर्वेदिक तज्ञांच्या यशाबद्दल अनेकांकडून ऐकून रुग्ण त्यांच्याकडे येतात. पण वैद्यकीय संभाषण आणि पुराव्यावर आधारित वैद्यकीय चाचण्यांच्या अभावामुळे तज्ञ आणि रुग्ण यांच्यामध्ये अजूनही खूप अंतर आहे.
याशिवाय लोकांना असेही वाटते की, आयुर्वेद उपचारांमध्ये गुण येण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि ती औषधे कडू असतात. पण डॉ प्राजक्ता हे आवर्जून सांगतात की, आयुर्वेदिक औषधे सध्या रुचकर आहेत आणि लोकांच्या गरजेनुसार उपचार पद्धतीनुसार बनविता येतात.