728X90

728X90

0

0

0

या लेखात

[shortcode_change_breadcrumb]
BP Control: ब्लडप्रेशर नियंत्रणाबाहेर आहे? काय करावे ते येथे दिलेले आहे.
5

BP Control: ब्लडप्रेशर नियंत्रणाबाहेर आहे? काय करावे ते येथे दिलेले आहे.

कमी ताण, जास्त शारीरिक हालचाल आणि जीवनशैलीतील काही बदल यामुळे तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहण्यात मदत होते. तसेच नियमित तपासणी करण्यास विसरू नका.
ब्लड प्रेशर नियंत्रणाबाहेर आहे

त्या दिवशी कौटुंबिक कार्यक्रम होता. स्वच्छता कारण्यासाठी रंजिनी हिरीयुर खाली वाकल्या. अचानक त्यांना खूप थकवा जाणवायला लागला आणि डोकं गरगरायला लागले. हे कमी होईल हा विचार करून त्या थोडावेळ झोपण्यासाठी गेल्या.

पण बेंगळुरूला राहणाऱ्या या ४९ वर्षीय गृहिणी जेव्हा उठल्या त्यावेळेस त्यांना जाणवले की त्या बोलू शकत नाहीयेत.  हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, त्यांचे ब्लडप्रेशर वाढले आहे आणि सिस्टॉलिक रीडिंग २२० आहे जे अत्यंत धोकादायक आहे.

पुढील काही दिवस त्या एक वेळ ठरवून त्या वेळी उन्हात फिरण्यासाठी गेल्या आणि त्यानंतर जवळच्या दवाखान्यात ब्लडप्रेशर तपासले. त्यांना हायपरटेन्शन असल्याचे निश्चित झाले.

आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेद्वारे सर्व धमन्यांमधून रक्त वाहते. ज्या विशिष्ट दाबाने ते धमन्यांमधून (विशेषतः मोठया धमन्यांमधून) वाहते त्याला ब्लडप्रेशर (रक्तदाब) म्हणतात.

जेव्हा दोन वेगवेगळ्या दिवशी ब्लडप्रेशर मोजले जाते त्यावेळेस जर दोन्ही दिवशी सिस्टोलिक ब्लडप्रेशर रीडिंग ≥ 140 mmHg असेल आणि/किंवा दोन्ही दिवसांचे डायस्टोलिक ब्लडप्रेशर रीडिंग ≥ 90 mmHg असेल, तर त्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे असे निदान होते.

हायपरटेन्शन ही एक सामान्य तीव्र स्थिती आहे जी रक्तवाहिन्यांमधील रक्ताच्या उच्च दाबामुळे निर्माण होते. याला ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते कारण लोकांना या आजाराचे कोणतेही लक्षण दिसत नाही किंवा जाणवत नाही.

हिरीयुर म्हणतात, “याआधी मला काही वेळा चक्कर यायची. “ हॉस्पिटलमध्ये मला सांगण्यात आले की, माझे ब्लडप्रेशर जास्त आहे, परंतु मी याकडे फारसे लक्ष दिले नाही. जेव्हा हॉस्पिटलमधील वासाने मला चक्कर आली आणि मी खाली पडले त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितले की माझे ब्लडप्रेशरचे रिडींग जास्त आहे. पण यावेळेस मात्र मला गांभीर्याने घ्यावे लागेल.”

बहुतेक व्यक्तींना हिरीयुर यांच्यासारखी लक्षणे जाणवत नाहीत. मग आपले ब्लडप्रेशर नियंत्रणाबाहेर आहे हे कसे समजते?

एमएस रमैया मेडिकल कॉलेजमधील जनरल मिडिसिनचे सहायक प्राध्यापक डॉ. जॉली अनिल जॉन सांगतात, “तुम्ही नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.” “ हा एकमेव मार्ग आहे. हायपरटेन्शन असलेल्या बहुतेक व्यक्तींना काही लक्षणे नसतात, पण त्यांच्या डोक्याचा मागचा भाग दुखतो ज्याच्याकडे ते सामान्यतः दुर्लक्ष करतात. महिलांना चक्कर येते.”

ब्लडप्रेशरची काही लक्षणे आपल्या नियंत्रणाच्या पलीकडे असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीचे वय जितके जास्त असेल तितका ब्लडप्रेशर असण्याची शक्यता जास्त असते.

पुरुषांमध्ये वयाच्या ५५ वर्षापूर्वी ब्लडप्रेशर होण्याची शक्यता जास्त असते. पण महिलांसाठी ही परिस्थिती वेगळी असते. डॉ जॉन म्हणतात, “स्त्रियांच्या मासिक पाळीमुळे त्यांचे स्ट्रोक आणि एमआय (मायोकार्डियल इन्फेक्शन) सारख्या परिस्थितींपासून रक्षण होते.” “पण रजोनिवृत्तीनंतर दोघांमध्येही (स्त्री आणि पुरुष) याचा धोका समान असतो. कधीकधी स्त्रियांमध्ये हा धोका जास्त असतो.”

कौटुंबिक इतिहास असणे हा एक नियंत्रणाबाहेरील घटक आहे; जर एक किंवा एकाहून अधिक नातेवाईकांना वयाच्या ६० वर्षांपूर्वी जर हायपरटेन्शन असेल तर हा धोका अजून वाढतो. हिरीयुर सांगतात, “माझ्या वडिलांना त्यांच्या वयाच्या ३७ व्या वर्षांपासून ब्लडप्रेशर आहे. ते काहीही काम करत नसले तरीही त्यांना ब्लडप्रेशरचा त्रास व्हायचा. त्यांना डॉक्टरांपेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने ब्लडप्रेशरची लक्षणे समजलेली होती. ही अनुवांशिक समस्या होती.”

मिठामुळे रक्तातील पाण्याची पातळी वाढते आणि धमन्यांमधील रक्तप्रवाह वाढतो. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना मीठ खाण्याचे प्रमाण कमी करण्यास सांगितले होते परंतू त्यांनी जवळजवळ मीठ खाणे सोडले होते. त्या सांगतात की, “हसत असताना किंवा झोपलेली असताना देखील ब्लडप्रेशर वाढते.” “त्यामुळे मी अत्यंत कमी मीठ खाते.”

पण तुमचे शरीर मिठाला कसा प्रतिसाद देते हे त्या व्यक्तीच्या अनुवांशिकतेवर अवलंबून असते (एखाद्या व्यक्तीचे शरीर मीठाला  प्रतिसाद देण्यासाठी अनुवांशिकरित्या कसे तयार झालेले असते). जवळपास ५० ते ६० टक्के रुग्ण हे मिठाने होणाऱ्या प्रतिक्रियेबद्दल संवेदनशील असतात आणि त्यामुळे त्यांना ब्लडप्रेशर असते.

याव्यतिरिक्त मेटाबॉलिक सिंड्रोम, किडनीचे आजार आणि थायरॉईड यासारख्या आजारांमुळेही  हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो.

मानसिक आरोग्याची काळजी घेतल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवायला मदत होते. डॉ. जॉन यांच्या मते तणावाचा ब्लडप्रेशराशी थेट संबंध आहे. तरुण उद्योजकांशी बोलताना त्या सांगतात, “ त्यांचे ब्लडप्रेशर(Blood Pressure) हे अत्यंत जास्त असते. त्या वयाच्या तिशीतील तरुण व्यक्ती आहेत. रात्री ना झोपणे हे ब्लडप्रेशर वाढण्याचे आणखी एक कारण आहे.”

बंगळुरूमधील ६२ वर्षांचे पशुवैद्यकीय डॉक्टर संजीव के.  यांचा असा विश्वास आहे की, त्यांच्या चांगल्या विनोदी स्वभावामुळे त्यांचे ब्लडप्रेशर नियंत्रणात रहाण्यात मदत झाली आहे. ते म्हणतात, “मी एक आनंदी माणूस आहे आणि मी कोणत्याही गोष्टीचा ताण घेत नाही.” मी स्वतः खूप हसतो आणि इतरांना हसवतो. हसत रहा. हा ताण दूर ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे.”

हायपर टेन्शनवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असले तरीही जीवनशैलीमध्ये बदल केल्याने हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दबाव वाढत नाहीये याची खात्री करण्यासाठी दर दोन महिन्यांनी ECG आणि ECHO काढण्याचा सल्ला डॉ. जॉन देतात.

हाय ब्लडप्रेशरसाठी(Blood Pressure) घरगुती उपाय

आहारातील बदलांपैकी एक तातडीने करण्यासारखा बदल म्हणजे मीठ आणि सोडियम खाणे टाळणे हे होय. मीठ खाल्ल्याने रक्त घट्ट होते आणि त्यामुळे ब्लडप्रेशर वाढते. डॉ. जॉन सांगतात, “ सतत हालचाल करत राहणे हे अत्यंत गरजेचे आहे.” “वजन तपासत रहा. जेवणामध्ये मिठाचे प्रमाण जास्त असलेले आणि लोणच्यासारखे पदार्थ खाणे टाळा. फळे आणि भाज्या खाणे कधीही चांगले. कमी प्रमाणात मटण खाणे योग्य आहे.  तसेच तुम्ही चिकन खाऊ शकता.”

औषधांव्यतिरिक्त केल्या जाणाऱ्या उपायांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण वाढविणे, मद्यपान कमी करणे किंवा न करणे तसेच धूम्रपान करणे टाळणे आणि शांत झोप घेणे यांचा समावेश होतो.

हिरियूर म्हणतात, “मी झोपेशी कधीही तडजोड करू शकत नाही.” “जर मला शांत झोप लागली नाही तर संपूर्ण दिवस माझे ब्लडप्रेशर वाढलेले असते. मला विश्रांती घेण्यासाठी दोन दिवस जास्त आराम करावा लागतो. मला दररोज कोणत्याही अडथळ्याशिवाय सात ते आठ तासांची झोप घेणे आवश्यक असते.”

डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांबरोबरच शारीरिक व्यायाम आणि आहारातील बदल यांमुळे ब्लडप्रेशर(Blood Pressure) नियंत्रणात ठेवण्यात मदत होते आणि काही केसेसमध्ये ते सामान्य स्थितीमध्ये आणता येते. तुमचे ब्लडप्रेशर नियमित तपासत राहणे ही महत्वाची बाब आहे ज्यामुळे बिघडणाऱ्या परिस्थितीची पूर्व सूचना मिळून आपण योग्य ते उपचार करू शकतो.

 

तुमचा अनुभव/कमेंट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

3 + 3 =

0

0

0

ट्रेडिंग

लेख

लेख
भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.
लेख
तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेवल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. छातीत जळजळ आणि अपचन यासारख्या समस्या टाळण्यासाठी हे करा
लेख
साखर आणि मीठ खाणे बंद करा. दररोज योगाभ्यास आणि प्राणायाम करा. यामुळे तुम्हाला तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यात लक्षणीय मदत मिळते.

Opt-in To Our Daily Newsletter

* Please check your Spam folder for the Opt-in confirmation mail

Opt-in To Our
Daily Newsletter

We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.