728X90

728X90

0

0

0

या लेखात

[shortcode_change_breadcrumb]
Food And Diabetes: अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ हे भारतातील डायबिटीसच्या वाढीस कारणीभूत: WHO
30

Food And Diabetes: अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ हे भारतातील डायबिटीसच्या वाढीस कारणीभूत: WHO

2011 ते 2021 या कालावधीत जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये देशातील अति-प्रक्रियायुक्त अन्न सेवनाच्या प्रवृत्तीवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे.
अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ
अल्ट्रा-प्रोसेस्ड खाद्यपदार्थ

628 हजार टन! 2021 मध्ये भारतीयांनी खाल्लेल्या इन्स्टंट नूडल्सचे हे एकूण वजन आहे. त्या वर्षी अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड (UPF) वर एकूण 2,535 अब्ज रुपये खर्च करण्यात आले, जे मागील वर्षी खर्च केलेल्या रकमेपेक्षा 267 अब्ज रुपयांनी जास्त आहेत. गेल्या दशकात भारतामध्ये UPF च्या वापरामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, ज्याला देशातील डायबिटीस आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्यांच्या वाढत्या प्रसाराचे मुख्य कारण मानले जाते.

बंगलोर, मिलर्स रोड येथील मणिपाल हॉस्पिटलमधील सल्लागार, अंतर्गत औषध आणि डायबिटीस तज्ञ डॉ प्रमोद व्ही सत्या म्हणतात, “प्रक्रिया केलेले अन्न खाणे हे अनेक आरोग्य समस्यांसाठी मुख्यतः डायबिटीस आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या समस्या, गैर-संसर्गजन्य गुंतागुंत यांसाठी जबाबदार असलेल्या मुख्य घटकांपैकी एक आहे.

2011 ते 2021 या कालावधीत देशातील UPF वापराच्या ट्रेंडवर ऑगस्ट 2023 मध्ये WHO-ICRIER (इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स) च्या प्रकाशित झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की, विशेषत: 2019 मध्ये साथीच्या आजारामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर लोकांमध्ये ब्रेकफास्ट सेरेल्स, रेडी टू इट फूड आणि मिठाचे प्रमाण जास्त असलेले स्नॅक्स खाण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.

भारतीय UPF बाजाराचे पाच स्तंभ

या अहवालाने भारतीय UPF बाजाराला पाच मुख्य श्रेणींमध्ये विभागले आहे, त्या प्रत्येकाच्या खाली अनेक खाद्यपदार्थ सूचीबद्ध केलेले आहेत:

1. ब्रेकफास्ट सेरेल्स

भारतातील ब्रेकफास्ट सेरेल्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आल्यामुळे WHO ने त्यांच्या अहवालात कमी साखर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह आरोग्यदायी पदार्थांची आवश्यकता व्यक्त केलेली आहे. देशातील डायबिटीसच्या वाढत्या आजाराचा संबंध हा UPF च्या जास्त वापराशी देखील जोडला गेला आहे.

“भारतातील लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये प्रीडायबेटिक केसेसमध्येही मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे करण्यास सोपी आणि  भविष्यात मागणी वाढविण्यासाठी उत्पादन सुधारणेची गरज आहे” असे अहवालात नमूद केलेले आहे.

ब्रेकफास्ट सेरेल्समध्ये, ओट्स, दलिया आणि मुसली या पदार्थांची 2021 मध्ये सर्वाधिक विक्री झाली होती. 2011 मध्ये भारतात सुमारे 12,000 टन कॉर्न फ्लेक्स विकले गेले होते, ज्यांची 2021 मध्ये 40,000 टन (रु. 14,008 दशलक्ष) पेक्षा जास्त विक्री झाली आहे.

2. तयार आणि सोयीस्कर अन्नपदार्थ

बहुतेक कंपन्यांनी घरून काम करण्याचा पर्याय निवडल्यामुळे 2020 मध्ये लॉकडाऊनमुळे तयार आणि सोयीस्कर खाद्यपदार्थांची मागणी वाढली होती असे अहवालात म्हटले आहे.

डॉ.  सत्य पुढे सांगतात की, “हे [UPF] झटपट खाण्यासारखे अन्नपदार्थ आहेत. पण ते अजिबात आरोग्यदायी नाही आणि UPF मध्ये भरपूर प्रमाणात साखर, कार्बोहायड्रेट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे शरीरासाठी हानिकारक असतात.

अहवालात असेही नमूद केले आहे की, या श्रेणीतील अन्नपदार्थांमध्ये अनेकदा मीठ, सोडियम आणि चरबी विशेषत: ट्रान्स फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते यामुळे आरोग्याची मोठी चिंता निर्माण होते. 2021 मध्ये 814 हजार टनांच्या विक्रीसह सॉस, मसाले आणि फूड ड्रेसिंग त्यानंतर इन्स्टंट नूडल्स आणि 450 हजार टन खाद्यपदार्थ खाण्यासाठी तयार पदार्थ या श्रेणीतील सर्वाधिक विकले जाणारे अन्न म्हणून उदयास आले.

3. मिठाचे प्रमाण जास्त असलेले स्नॅक्स

2019 मध्ये सॉल्टी स्नॅक्स, कोल्डडिंक्स यांची एकूण किरकोळ विक्री मूल्याच्या दृष्टीने होणारी वाढ देखील या साथीच्या रोगात दिसून आली. या श्रेणीमध्ये बटाटा चिप्स, टॉर्टिला चिप्स, पफ्ड स्नॅक्स, पॉपकॉर्न, सेव्हरी बिस्किटे आणि इतर भारतीय सॉल्टी स्नॅक्स किंवा नमकीन (जसे की भुजिया आणि शेव) यांचा समावेश होतो.

“अनेक पदार्थांमध्ये मीठ आणि चरबीचे प्रमाण हे WHO SEAR (दक्षिण-पूर्व आशियाई क्षेत्र) न्यूट्रिएंट प्रोफाइल मॉडेल (NPM) यांनी दिलेल्या नियमांपेक्षा तिप्पट आहे. बाजारात आरोग्यदायी पदार्थांमध्ये विविधता आणण्याच्या मुख्य समस्यांपैकी एक समस्या म्हणजे आरोग्यदायी पदार्थांच्या उत्पादनातील धोरण समर्थनाचा अभाव आहे”असे अहवालात सांगितले आहे.

हॅपीएस्ट हेल्थच्या व्हिडिओ सीरिज ‘द व्हाय अॅक्सिस’मध्ये बोलताना, बंगळुरूच्या सेंट जॉन्स मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या फिजियोलॉजी विभागाच्या प्राध्यापक, डॉ अनुरा कुरपड म्हणाल्या, “डायबिटीस असलेल्या काही व्यक्ती या साखर खाणे टाळतात, तर मिठाचे पदार्थ जास्त खाण्याकडे त्यांचा कल असतो. जर तुम्ही स्टार्चपासून बनवलेले भरपूर चिप्स किंवा मिठाचे स्नॅक्स खात असाल आणि तुम्ही स्वतःला डायबिटीसपासून वाचविण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात.”

4. चॉकलेट आणि मिठाई

जेव्हा चॉकलेट आणि मिठाईचा विचार केला जातो तेव्हा किरकोळ विक्री मूल्य आणि व्हॉल्यूम या दोन्ही बाबतीत बाजारातील गोड बिस्किटांचा वाटा हा सर्वात मोठा आहे असे दिसून आलेले आहे. अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, गोड बिस्किटे ही तुमच्या आरोग्यास हानिकारक असतात, कारण लगेचच उपलब्ध होणारे पदार्थ  म्हणून ती खाल्ली जातात (विशेषत: लहान मुलांद्वारे) आणि त्यांचे शेल्फलाइफ जास्त असते.

“धोरणे तयार करण्यासाठी गोड बिस्किटांच्या उपवर्गावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. याचे कारण असे की ते खाण्याचे प्रमाण मुख्यतः मुलांमध्ये जास्त आहे, त्यांची किंमत कमी आहे आणि आरोग्यदायी उत्पादने म्हणून अशा खाद्यपदार्थांच्या विपणनातही वाढ झालेली आहे” अहवालात नमूद केले आहे. गोड बिस्किटांनंतर केक आणि पेस्ट्रीसह आइस्क्रीम आणि फ्रोझन डेझर्टची सर्वाधिक विक्री झालेली आहे.

5. शीतपेये (साखर सह आणि शिवाय)

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, कार्बोनेटेड शीतपेये आणि कोलाने त्यांच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे सांगितले आहे, तर फ्लेवर्ड दूध आणि रस उत्पादनांची बाजारपेठेत सर्वाधिक वाढ झालेली दिसून आली आहे. एकट्या 2021 सालामध्ये किरकोळ विक्रीचे प्रमाण पाहता, स्क्वॅशने बाजारपेठेतील 77 टक्के विक्रीचा वाटा उचललेला आहे.

“यापैकी बहुतेक पदार्थांमध्ये रासायनिक घटक आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, ज्यामुळे दीर्घकाळासाठी आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ते अप्रत्यक्षपणे कर्करोगास कारणीभूत ठरतील अशा समस्या देखील निर्माण करू शकतात” असे कोलकाता येथील अपोलो कॅन्सर सेंटरचे  रेडिएशन ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ.  सायन पॉल म्हणतात.

अहवालात असेही सुचवण्यात आले आहे की, पँडेमिकमुळे कोला आणि कार्बोनेटेड पेये यांच्याकडून ज्यूस आणि फ्लेवर्ड दुधाकडे वळले, तरीही या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात साखर असते आणि ते आरोग्यदायी पदार्थांचा पर्याय असू शकत नाहीत. WHO ने नुकतेच aspartame  संभाव्य कार्सिनोजेन  एक लोकप्रिय कृत्रिम स्वीटनर जे साखर मुक्त पेयांमध्ये वापरले जाते असे त्याचे वर्गीकरण केलेले आहे.

इंटरनॅशनल डायबिटीज फेडरेशन (आयडीएफ) डायबेटोलॉजिस्ट आणि चेअर-इलेक्टचे (दक्षिण आशिया) डॉ. बंशी साबू हे सक्षम नियामक उपाय अंमलात आणण्याच्या गरजेवर भर देतात कारण देशातील आर्थिक पार्श्वभूमी आणि वयोगट तसेच सर्व समाजातील लोकांमध्ये UPF वापर (साखरयुक्त पेयांसह) वाढत आहे. आत्तापर्यंत, भारतात किमान 101 दशलक्ष लोक डायबेटीसने ग्रस्त आहेत, आणखी 136 दशलक्ष लोक प्री-डायबिटीक असल्याचे मानले जात आहे.

तुमचा अनुभव/कमेंट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × one =

0

0

0

ट्रेडिंग

लेख

लेख
भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.
लेख
तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेवल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. छातीत जळजळ आणि अपचन यासारख्या समस्या टाळण्यासाठी हे करा
लेख
साखर आणि मीठ खाणे बंद करा. दररोज योगाभ्यास आणि प्राणायाम करा. यामुळे तुम्हाला तुमचे ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यात लक्षणीय मदत मिळते.

Opt-in To Our Daily Newsletter

* Please check your Spam folder for the Opt-in confirmation mail

Opt-in To Our
Daily Newsletter

We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.