
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्या व्यक्तींना डायबेटीस आहे त्यांनी डेंग्यूपासून अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे आणि त्याचा गंभीर परिणाम होऊ नये म्हणून खबरदारी घेणे आवश्यक आहे.विशेषतः डायबेटीस असलेल्या व्यक्तींमध्ये शरीराचे जास्त वजन, हाय ब्लडप्रेशर आणि इतर संबंधित आरोग्य परिस्थिती असल्यामुळे त्यांच्यामधील डेंग्यू गंभीर होऊ शकतो. डेंग्यूमुळे होणार्या जळजळ व्यतिरिक्त, रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो, डेंग्यूच्या तापामुळे भूकेवरही परिणाम होतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वरखाली होते आणि डायबेटीस असलेल्या व्यक्तींना जास्त धोका असतो.
“डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणि प्लेटलेटच्या संख्येवरही बारीक लक्ष ठेवले पाहिजे,” असा इशारा मुंबई येथील एस एल रहेजा हॉस्पिटलमधील ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. अनिल भोरस्कर देतात. ते असेही सांगतात की, ज्यांना डायबेटीस आहे आणि ज्यांना हृदयविकार, हायपरटेन्शन आणि मूत्रपिंडाचा आजार यांसारख्या आजारांचे आधीच निदान झालेले आहे त्यांना शारीरिक समस्या निर्माण होण्याची अधिक शक्यता असते.
पीएलओएस वन (पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सने प्रकाशित केलेले पीअर-पुनरावलोकन जर्नल) मध्ये प्रकाशित झालेल्या मेटा-विश्लेषणानुसार आणि केस कंट्रोल स्टडीज आणि नऊ पूर्वलक्षी समूह अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विशेषतः हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार, श्वसन रोग आणि मुत्र रोग, तसेच वृद्धापकाळ यांच्या संबंधीच्या सह्व्याधींचा डेंग्यूमध्ये गंभीर परिणाम होऊ शकतो.
डायबेटीस आणि डेंग्यू: रक्तातील कमी साखरेच्या परिणामांकडे लक्ष द्या
डॉ.भोरसकर यांच्या म्हणण्यानुसार, जास्त ताप आलेला असताना रुग्णाचे जेवण अत्यंत मर्यादित असते आणि रुग्णाला पुरेशा कॅलरी मिळत नाहीत ज्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो. या व्यतिरिक्त, जर रुग्णाला विशेषतः तोंडावाटे औषध देत राहिली तर त्याला हायपोग्लाइसेमिया होऊ शकतो. “ही एक धोकादायक परिस्थिती आहे” असा इशारा डॉ. भोरसकर देतात.
संपूर्ण रक्त गणना किंवा CBC चाचणी करून पांढऱ्या रक्त पेशींची संख्या निर्धारित करण्यात मदत होते ज्या प्लेटलेटची संख्या कमी झाल्यावर वाढतात. जर प्लेटलेटची संख्या खूपच कमी झाली आणि 50,000 च्या पातळीच्या खाली गेली, तर रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल आणि प्लेटलेट ट्रान्समीटरसह IV द्रव द्यावे लागते.
“ज्या व्यक्तींना या परिस्थितीचा सामना करावा लागतो विशेषत: ज्या व्यक्तींना डायबेटीस आहे अशा व्यक्तींनी सतर्क राहणे आवश्यक आहे कारण डायबेटीस असलेल्या व्यक्तींना त्यांच्या जीवनावश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करणे आवश्यक असते.
डायबेटिसमुळे डेंग्यूमधील गुंतागुंत वाढू शकते का?
बंगळुरू येथील मणिपाल हॉस्पिटलमधील सल्लागार- अंतर्गत औषध आणि मधुमेह तज्ज्ञ डॉ. प्रमोद व्ही सत्य सांगतात की, रक्तस्रावी ताप आणि शॉक सिंड्रोम या दोन्हींमध्ये व्यक्तीच्या प्लेटलेटची संख्या खूप कमी असल्यास डेंग्यूच्या आजरमधील गुंतागुंत वाढते.
डेंग्यू हेमोरेजिक ताप हा एक सिंड्रोम आहे ज्यामध्ये रक्तवाहिन्या किंवा केशिकांमधून शरीरात अंतर्गत रक्तस्त्राव होतो आणि फुफ्फुस, पोट, पित्ताशय, यकृतामध्ये पाणी साचते आणि परिणामी रक्तदाब खूप कमी होतो ज्याला डेंग्यू शॉक सिंड्रोम असे म्हणतात.
उपचार पद्धती
गंभीर अवस्थेतील डेंग्यू असलेल्या कोणत्याही व्यक्तीला नेहमीच्या उपचार पद्धतीमध्ये IV द्रवपदार्थ, प्लेटलेट रक्तसंक्रमण दिले जाते जे रक्तातील साखरेवर परिणाम करत नाही. काही क्वचित प्रसंगी स्टेरॉईड्स देखील दिली जातात ज्यामुळे प्लेटलेट्सची संख्या वाढू शकते.
डॉ सत्या म्हणतात की, इतर कोणत्याही संसर्गाप्रमाणेच डेंग्यूमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. कारण कोणताही असले तरी संसर्ग किंवा जळजळ हे सामान्यतः तणावाचे हॉर्मोन वाढवते आणि रक्तातील साखरेमध्ये किरकोळ वाढ करण्यास कारणीभूत ठरते परंतु असे कोणतेही ठोस पुरावे नाहीत जे दाखवतात की, डायबेटीस हा रक्तातील साखरेच्या पातळीवर किंवा उलट परिणाम करतो.
डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी डेंग्यूमध्ये घ्यायची काळजी
डायबेटोलॉजिस्ट डॉ. अश्विता श्रुती दास म्हणतात की, डेंग्यूचा ताप आलेल्या व्यक्तींमध्ये रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो हे लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे रक्त पातळ करणारी औषधे घेणे बंद करणे आवश्यक आहे.
डॉ.भोरसकर म्हणतात, डायबेटीस असलेल्या व्यक्तींना ताप आल्यास त्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा रक्तातील साखरेचे निरीक्षण केले पाहिजे आणि त्यानुसार इन्सुलिन घेणे आवश्यक आहे. ते म्हणतात की, तोंडावाटे औषधे घेणे टाळणे चांगले आहे.
“अनेक वेळा, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमुळे हे आणखी गंभीर होते, म्हणून तोंडाद्वारे औषधे घेणे कमी करणे चांगले आहे आणि जर रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असेल तर रुग्णाला इन्सुलिन देणे चांगले आहे कारण इन्सुलिनचा प्रभाव हा गोळ्यांपेक्षा खूप चांगला असतो.”
जर रुग्णाची प्लेटलेट संख्या गंभीररित्या कमी झालेली असेल तर त्याला एकाधिक रक्तस्त्राव होऊ शकतो, जीआय ट्रॅक्टमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो आणि रक्त कमी होणे आणि डिहायड्रेशनमुळे शॉक लागू शकतो.
डेंग्यूवर मात करण्यासाठी द्रव पदार्थांचे सेवन करा
डेंग्यूच्या तापाशी लढा देत असलेल्या रुग्णांनी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी हायड्रेटेड राहणे आवश्यक आहे. ताप कमी करण्यासाठी त्यांनी सलाईन घेणे वाढवावे, पूर्ण विश्रांती घ्यावी आणि पॅरासिटामॉल घ्यावे.
“डिहायड्रेशन न होण्यासाठी साखर असलेले फळांचे ताजे रस, नारळाचे पाणी किंवा मीठ घालून लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो” असे डॉ. भोरस्कर म्हणतात.
डायबेटीस असलेल्या व्यक्तींना विशेषत: वृद्ध व्यक्तींनी देखील डास चावू नये याकरिता त्यांच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विशेषत: जर त्यांच्या परिसरात पाणी साचलेले असेल आणि सध्या पसरलेल्या प्रादुर्भावाची माहिती असेल तर अतिरिक्त सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
बोध
- डायबेटीस आणि डेंग्यूचा ताप आलेल्या व्यक्तींनी दिवसातून तीन ते चार वेळा त्यांच्या रक्तातील साखरेच्या पातळीचे निरीक्षण करणे आवश्यक आहे.
- रक्त पातळ करण्याची औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी रक्तस्त्राव आणि डेंग्यूमधील शॉक सिंड्रोमचा धोका टाळण्यासाठी औषधे थांबवणे आवश्यक आहे ज्यांचा वेळेवर उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकते.
- डेंग्यू झालेल्या व्यक्तींनी स्वतःला हायड्रेटेड ठेवणे आवश्यक आहे आणि गंभीर परिस्थितींमध्ये त्यांना IV, प्लेटलेट रक्तसंक्रमण देणे आवश्यक आहे.