
डायबिटीज खूप दुर्धर आजार असू शकतो. मुले आणि वृद्ध लोकांव्यतिरिक्त, नवजात शिशूंना देखील डायबिटीज होऊ शकतो. तान्ह्या बाळांना त्यांच्या जन्माच्या सहा महिन्यानंतर जर डायबिटीजचे निदान झाले असेल तर त्याला नियोनेटल डायबिटीज असे म्हणतात. UH रेनबो बेबीज अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल, क्लीव्हलँड, यूएसए चे बालरोग एंडोक्राइनोलॉजिस्ट, डॉ केसेनिया टोन्युष्किना, यांच्या मते, जेनेटिक उत्परिवर्तनामुळे होणारा डायबिटीज सुमारे 100,000 ते 400,000 बालकांमध्ये अंदाजे एका बाळाला होतो.
नियोनेटल डायबिटीज(Diabetes In Newborns) कशामुळे होतो?
डॉ टोन्युष्किना म्हणतात की, नियोनेटल डायबिटीज बाळाच्या जीवनाच्या पहिल्या 12 महिन्यात स्वादुपिंडाच्या विकासादरम्यान झालेल्या दोषामुळे होतो ज्यामध्ये डायबिटीजची सुरुवातीची लक्षणे दिसतात किंवा रक्त आणि लघवीत ग्लुकोजची लेव्हल वाढलेली असते. त्या म्हणतात, “याचं मुख्य कारण स्वादुपिंडाच्या बीटा पेशींच्या विकासावर आणि कार्यावर परिणाम करणाऱ्या जनुकातील अनपेक्षित उत्परिवर्तन होय. आणि बहुतेक केसेसमध्ये, आईला रक्तातील ग्लुकोजची समस्या नसते किंवा डायबिटीजही नसतो.”
बेंगळुरू, मराठाहल्ली येथील रेनबो चिल्ड्रन्स हॉस्पिटलचे, सल्लागार, नवजात शिशू तज्ञ आणि बालरोग तज्ञ, डॉ संदीप आर यांच्या मते नियोनेटल डायबिटीजची लक्षणे जरी बाळाच्या जीवनाच्या पहिल्या महिन्यात दिसत असली तरी त्याचे निदान सहा महिन्यांच्या शेवटीच होते.
अनेक बाळ ज्यांना नियोनेटल डायबिटीज असतो त्यांचा जन्म नऊ महिने पूर्ण व्हायच्या आतच झालेला असतो. “अशा वेळेअगोदर जन्मलेल्या बाळांना NICU [नवजात शिशू अतिदक्षता विभाग] मध्ये निरीक्षणासाठी ठेवलं जातं आणि अशा केसेसमध्ये, या बाळांचे रक्त नियमितपणे चेक केलं जात असल्यामुळे डायबिटीजचे निदान लवकर होते. डॉ. संदीप म्हणतात की, जर त्यांची शुगरची लेव्हल कमी-जास्त होत असेल, नियंत्रणात नसेल, तर आम्हाला समजतं की या बाळाला नियोनेटल डायबिटीज असू शकतो.”
नवजात शिशूंमध्ये डायबिटीजची लक्षणे
इतर सर्व कारण नाकारली जात असता नवजात शिशूमध्ये रक्तातील ग्लुकोजची लेव्हल (>200 mg/dl) नेहमीच वाढलेली असेल तर त्याला डायबिटीज झाला आहे असं समजलं जातं. डॉ टोन्युष्किना म्हणतात, “डायबिटीज झाल्याची पुष्टी ही जेनेटिक टेस्टींगमध्ये कारणीभूत जीनचे उत्परिवर्तन आढळल्यास होते.”
डॉ. संदीप पुढे सांगतात की, डायबिटीज ओळखण्याच एक लक्षण हे आहे की बाळाच पोषण चागल असूनही त्याची नीट वाढ न होणं, जसं की वजन न वाढणं. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतरही सहसा ही लक्षणं दिसून येतात. ते म्हणतात की, “सुमारे 30 ते 40 टक्के बाळांना IUGR (इंट्रायूटरिन ग्रोथ रिस्ट्रिक्शन) असतो ज्यामध्ये बाळाचे वजन कमी असते आणि ते जन्मत:च कुपोषित असते.”
तज्ञांच्या मते, नियोनेटल डायबिटीजची ही लक्षणं आहेत:
- डायबिटीज किटोअॅसिडोसिस (रक्तात अॅसिड तयार होणं).
- बाळाची वाढ आणि विकास व्यवस्थित न होणं
- वारंवार लघवी येणं आणि तहान लागणं
- डीहायड्रेशन
नियोनेटल डायबिटीज (neonatal diabetes) चे प्रकार
तज्ञ असं म्हणतात की नवजात शिशूंमध्ये होणारा डायबिटीज हा तात्पुरता किंवा कायमस्वरूपी असू शकतो. क्लिनिकल प्रेझेंटेशन आणि रोगनिदान यावर आधारित, याचे चार प्रकार आहेत:
♦ नवजात शिशूंचा तात्पुरत्या स्वरूपाचा डायबिटीज (ट्रांझियंट नियोनेटल डायबिटीज)
नियोनेटल डायबिटीजच्या सुमारे 20 टक्के केसेस तात्पुरत्या स्वरूपाची असतात. बाळांना 13 आठवडे ते दीड वर्षे या डायबिटीजचा त्रास होत नाही, म्हणजेच हा कायमस्वरूपाचा नसतो. पण, काहींना किशोरावस्थेत किंवा प्रौढावस्थेत इतर डायबिटीजचे प्रकार होऊ शकतात.
♦ सल्फोनील्युरिया-रीस्पाॅन्सिव्ह नियोनेटल डायबिटीज
डॉ टोन्युष्किना यांच्या मते 40 टक्के बाळांना हा डायबिटीज होतो. इन्सुलिनचा स्त्राव सुधारण्यास मदत करणाऱ्या तोंडावाटे दिल्या जाणाऱ्या औषधांना लहान मुले चांगला प्रतिसाद देतात. पण, काही केसेसमध्ये त्यांना आयुष्यभर औषधं घ्यावी लागू शकतात.
♦ इन्सुलिनची गरज असलेला नियोनेटल डायबिटीज
सुमारे 10 टक्के केसेसमध्ये इन्सुलिनची गरज भासते आणि त्यांना कायमस्वरूपी इन्सुलिन थेरपीची घ्यावी लागते.
♦ जेनेटिक सिंड्रोमशी संबंधित नियोनेटल डायबिटीज
अंदाजे 10 टक्के केसेसमध्ये जेनेटिक सिंड्रोमशी संबंधित लक्षणे दिसून येतात ज्यामध्ये हायपरग्लायसेमिया सोबतच अनेक अवयवांमध्ये विशिष्ट दोष पाहायला मिळतात.
नियोनेटल डायबिटीजचे परिणाम
नियोनेटल डायबिटीज असलेल्यांची वाढ उशिरा होते, शिकण्यात मर्यादा असतात, स्नायू कमकुवत असतात आणि जन्माच्या वेळी कमी वजन असते. डॉ. टोन्युष्किना यांच्या मते, “इतर प्रकारच्या डायबिटीजमध्ये (टाइप 1 किंवा टाईप 2 डायबिटीज मेलायटस) जे दुष्परिणाम होतात जसे की, डोळयाचा पडदा (रेटीना), किडनी आणि पाय यांच्यातील लहान आणि मोठ्या रक्तवाहिन्यांना इजा तसेच हृदय व त्याच्या रक्तवाहिन्यासंबंधित आजार, तेच नियोनेटल डायबिटीजमध्येही होतात.”
याशिवाय, अचानक रक्तातील शुगर वाढणं, शरीरात अॅसिड तयार होणं आणि जागरूकतेची बदललेली स्थिती ज्याला केटोअॅसिडोसिस म्हणतात ते नियोनेटल डायबिटीज असलेल्या बाळांना होण्याचा धोका जास्त असतो. ही लक्षणं आटोक्यात आणण्यासाठी इन्सुलिन घ्यायची गरज असते.
यांमुळे अशा मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं जीवनच बदलून जातं. मुलं मोठी झाल्यावर त्यांना टाइप 1 डायबिटीज किंवा टाइप 2 डायबिटीज होण्याचा धोका जास्त असतो. बाळ फक्त दूध पीत असल्यामुळे सुरुवातीला औषधोपचार किंवा इन्सुलिनद्वारे हा डायबिटीज नियंत्रित केला जाऊ शकतो. पण, डॉ. संदीप यांच्या मते, मुल शाळेत जाऊ लागली आणि जड अन्न घेऊ लागली की या डायबिटीजला नियंत्रणात ठेवणं कठीण जाऊ शकतं. ते सांगतात की, “सहसा आम्ही मुलांना सर्व काही योग्य प्रमाणात खाण्याचा सल्ला देतो आणि पालकांनाही त्यांच्या मुलांच्या आहाराबाबत तसंच वागण्याचा सल्ला देतो. पण असं करत असताना त्यांच्या मुलाच्या इन्सुलिनचा डोस त्यानुसार अॅडजस्ट करण्याचा सल्ला देतो.”
म्हणून, मेंदूची वाढ होत असताना हायपोग्लाइसेमिया होऊ नये यासाठी आई-वडिलांनी मुलांवर सतत लक्ष दिलं पाहिजे, डॉक्टरांसोबत नियमित फॉलोअप ठेवला पाहिजे, योग्य प्रमाणात इन्सुलिन आणि इतर औषधे (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार) दिली पाहिजेत. ते म्हणतात, “हायपोग्लाइसेमियाचा प्रत्येक प्रसंग त्यांच्या मेंदूच्या विकासावर परिणाम करू शकतो. पण, पालकांणा योग्य शिक्षण दिल्यामुळे ही स्थिती चांगल्या प्रकारे हाताळली जाऊ शकते.”
लक्षात ठेवायच्या गोष्टी
- नियोनेटल डायबिटीजमध्ये बाळांमध्ये रक्तातील शुगरचे प्रमाण जास्त असते. सहसा सहा महिन्यांच्या वयात याचे निदान होते.
- याची लक्षणं आहेत, व्यवस्थित वाढ आणि विकास न होणं, किटोअॅसिडोसिस, वारंवार लघवी होणं, तहान लागणं आणि डीहायड्रेशन.
- नियोनेटल डायबिटीज असलेल्यांना मोठं झाल्यावर टाईप 1 किंवा टाईप 2 डायबिटीज होण्याचा धोका जास्त असतो.
- आई-वडिलांनी नियमितपणे मुलाच्या रक्तातील ग्लुकोजची लेव्हल चेक केली पाहिजे आणि त्यानुसार इन्सुलिनचा डोस अॅडजस्ट केला पाहिजे.