
डायबिटीजला प्रभावीपणे नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यासाठी असणारे मशरूम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मशरूमचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे रक्तातील शुगर अचानक वाढत तर नाहीच, पण अँटिऑक्सिडंटसारखी पोषक तत्त्वं असल्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तसंच इन्सुलिनचं कार्यही नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. मशरूमचा ग्लायसेमिक भार (खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या लेव्हलमध्ये अपेक्षित वाढ होण्याचा अंदाज) कमी असल्यामुळे डायबिटीज असलेल्यांसाठी त्यांच्या मेन्यूसाठी परिपूर्ण गोष्ट आहे.
हैदराबाद येथील कमिनेनी हॉस्पिटल्सचे एंडोक्राइनोलॉजिस्ट, डॉ संदीप रेड्डी यांच्या मते, मशरूममध्ये कमी कॅलरीज तसेच जीवनसत्त्व ड ने समृद्ध असल्यामुळे, ते डायबिटीज असलेल्या लोकांसाठी एक चांगला पर्याय आहेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि बुरशीचा ग्लायसेमिक भार यांचा रक्तातील शुगरवर परिणाम होत नाही. ते पुढे सांगतात, “मशरूममध्ये कर्बोदके कमी असतात; खरं तर, ते प्रथिनांनी समृद्ध आहेत.”
कोची येथील क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट सल्लागार, डॉ मुमताज खालिद इस्माईल यांच्या मते, मशरूममध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे फायबर असल्यामुळे रक्तातील शुगरची अचानक वाढ होत नाही. मशरूम खाल्ल्यामुळे एखाद्याला तृप्त वाटते आणि त्यामुळे ते स्वतःला जास्त खाण्यापासून रोखू देखील शकतात.
मशरूम आणि डायबिटीजचे व्यवस्थापन
डॉ रेड्डी म्हणतात की डायबिटीजला चांगलं नियंत्रणात ठेवण्यासाठी लागणारे फॉस्फेट, मॅग्नेशियम आणि सेलेनियम यांनी मशरूम समृद्ध आहेत. पण, जास्त प्रमाणात सेलेनियम सेवन केल्याने वाईट परिणाम देखील होऊ शकतात. म्हणून, संयम गरजेचा आहे. ते पुढे सांगतात, “मशरूममध्ये बीटा-ग्लुकन नावाचं फायबर आहे ज्यामुळे पोट रिकामं होण्यास उशीर आणि ग्लुकोजचं शोषण होण्यास मदत होते.
ते पुढे सांगतात की ग्लुकोजच्या चयापचयाला मदत करणारं जस्त मशरूममध्ये असते. साधारणपणे, 100 ग्रॅम मशरूममध्ये सुमारे 1.4 मिलीग्राम जस्त असते. पण, मशरूमच्या जातीनुसार जस्तचे प्रमाण बदलू शकते. जस्त इन्सुलिनची संवेदनशीलता तर सुधारतेच पण सोबतच डायबिटीज असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील ग्लुकोजची लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या स्वादुपिंडातून इन्सुलिनचा होणारा स्रावही सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
अभ्यासानुसार असं समजलं आहे की मशरूममध्ये पॉलिसेकेराइड्स नावाचं संयुग असतं जे डायबिटीजला नियंत्रणात ठेवू शकतं. त्यांच्या अँटी-हायपरग्लाइसेमिक गुणधर्मामुळे शरीरात ग्लुकोज शोषून घ्यायची क्षमता कमी होते आणि इन्सुलिन संवेदनशीलता वाढते.
तसेच, मशरूम हे एर्गोथिओनिन आणि ग्लूटाथिओन सारख्या अँटिऑक्सिडंट्स ने समृद्ध असते. मशरुममुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि परिणामी कोरोनरी आर्टरी डिसीज, डायबिटीज आणि डीमेंशिया यांसारखे अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.
डॉ इस्माईल यांच्या मते, “मशरूम हे पोटॅशियम आणि फोलेट सारख्या महत्त्वाच्या पोषक तत्वांनी समृद्ध आहेत.” असं दिसून आलं आहे की फॉलिक अॅसिडमुळे ग्लायसेमिक इंडेक्स नियंत्रणात राहतो ज्यामुळे डायबिटीज नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्या पुढे सांगतात की 100 ग्रॅम मशरूममध्ये सुमारे 318 मिलीग्राम पोटॅशियम आणि 8 मायक्रोग्राम फोलेट (फॉलिक अॅसिड) असते.
मशरूमच्या कोणत्या जातीमुळे डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास मदत होते?
डॉ. रेड्डी यांच्या मते, “मशरूमच्या बऱ्याच जाती आहेत, जंगली मशरूममध्ये खनिजाचे प्रमाण अधिक असते. अँटीडायबिटीक, तसंच अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्मामुळे ऑयस्टर मशरूम आहारात एक चांगला पर्याय आहे.” शिवाय, ऑयस्टर मशरूममध्ये उच्च प्रथिनं आणि कमी कर्बोदके असल्यामुळे इन्सुलिनची लेव्हल नियंत्रणात राहते, वाढत नाही.
मायमनसिंग मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ऑयस्टर मशरूमच्या अँटीडायबिटीक गुणधर्मांचा अभ्यास केला गेला. या अभ्यासात डायबिटीज असलेल्या 89 व्यक्तींना एका आठवड्यासाठी ऑयस्टर मशरूमचा अर्क देण्यात आला आणि पुढील आठवड्यात ते बंद करण्यात आले आणि नंतर पुढील आठवड्यात पुन्हा दिले गेले. यावरून हे समजलं की ज्या दोन आठवड्यांत या व्यक्तींना अर्क देण्यात आला होता त्या आठवड्यात रक्तातील ग्लुकोजची लेव्हल लक्षणीयरीत्या कमी झाली होती.
आहारामध्ये मशरूमचा समावेश करणे
डॉ इस्माईल यांच्या मते, डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात कमी कॅलरीज असलेलं बटण मशरूम (जे सर्वाधिक सेवन केलं जातं) त्याचा समावेश करणं ज्यामध्ये असतात – ते आहारात समाविष्ट करणं हा एक चांगला पर्याय आहे. त्या पुढे म्हणतात की 100 ग्रॅम बटन मशरूममध्ये अंदाजे 27.49 कॅलरीज असतात.
आहारात मशरूम समाविष्ट करण्याचे काही मार्ग त्या सुचवतात:
- मशरूमला अंड्यांसोबत एकत्र करून पौष्टिक ऑम्लेट, सँडविच किंवा रॅप्स देखील तयार केलं जाऊ शकतं.
- डायबिटीज असलेल्या व्यक्तींसाठी कमी-कॅलरीज, भरपूर फायबर हवं असेल तर मशरूम आणि ताजे हिरवे वाटाणे यांचं कॉम्बिनेशन एक पर्याय होऊ शकतो.
- सूपमध्ये बीन्स आणि गाजरांसोबत मशरूम देखील वापरलं जाऊ शकतं.
डॉ रेड्डी यांच्या मते, “दररोज सुमारे 200 ग्रॅम मशरूम आहारात घेणं योग्य आहे.”
मशरूम कधीही कच्चे खाऊ नयेत
डॉ. इस्माईल सांगतात की,“मशरूम कधीही कच्चे खाऊ नयेत.” ते नेहमी शिजवून किंवा उकळून खाल्ले पाहिजेत. तसेच, ज्यांना मशरूमची ऍलर्जी आहे त्यांनी ते खाऊ नयेत.
डॉ. इस्माईल यांच्या मते, सुरक्षा आणि स्वच्छतेच्या कारणामुळे, मशरूम वापरण्यापूर्वी नेहमी पूर्णपणे स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. त्या हायलाईट करतात की मशरूम दोन ते तीन दिवस टिकतात म्हणून ते त्याच्या आधीच वापरले गेले पाहिजेत.
लक्षात ठेवायच्या गोष्टी
डायबिटीज-पूरक आहार हा डायबिटीज नियंत्रणात ठेवण्याचा एका महत्त्वाचा भाग आहे. कमी कॅलरीज, समृद्ध पोषक घटक आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स यामुळे मशरूम हा एक चांगला पर्याय मानला जातो. पण, मशरूम कधीही कच्चे खाऊ नयेत. मशरूम अंड्याच्या पांढऱ्या भागासोबत एकत्र करून पौष्टिक ऑम्लेट, तसेच सँडविच आणि सूप देखील बनवलं जाऊ शकतं.