
जेव्हा डायबेटीस नियंत्रणाचा विचार केला जातो तेव्हा अगदी लहान चूक देखील आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्याच्या उद्दिष्टांमध्ये अडथळा आणू शकते. तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, डायबेटीससाठी योग्य असलेले स्नॅक्स निवडले तरीही, डायबेटीस असलेल्या व्यक्ती या काहीवेळा आरोग्यदायी डिप्सऐवजी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे केचअप आणि सॅलड डिप्ससारखे प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले डिप्स निवडतात.
तुमचा डायबेटीस नियंत्रणात ठेवण्यावर डिप्सचा(चटणीचा) कसा परिणाम होतो
या डिप्स(चटणी) किंवा मसाल्यांमध्ये केवळ प्रिझर्व्हेटिव्ह नाहीत तर त्यात ट्रान्स फॅट्स आणि साखर देखील असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
मणिपाल हॉस्पिटलमधील व्हाईटफील्डच्या डायबेटीस आणि एंडोक्राइनोलॉजीच्या सल्लागार डॉ. श्रीदेवी अटलुरी म्हणतात, “ज्या व्यक्ती रोज टोमॅटो केचप खातात त्यांना याची कल्पना नसते की, त्यात कॉर्न सिरप असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
यापुढे डॉ. अटलुरी सांगतात की, स्नॅक्स खाताना त्याबरोबर मेयोनीज, पीनट बटर, चीज डिप्स यांसारखे मसालेखाणे टाळले पाहिजे कारण त्यामधील फॅटी ऍसिडच्या जास्त प्रमाणामुळे इन्सुलिनची प्रतिरोधक क्षमता वाढते. जास्त कॅलरीयुक्त पदार्थांमुळे वजन वाढते आणि कोलेस्टेरॉलची समस्या देखील उद्भवते.
डायबेटोलॉजिस्ट डॉ. अश्विता श्रुती दास म्हणतात की, डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या आहारात जास्त सोडियम आणि साखर असलेल्या प्रिझर्व्हेटिव्ह्जसह आरोग्यदायी नसलेले पदार्थ वारंवार खाल्ले तर ते हायपरटेन्शन, लठ्ठपणा, हाय कोलेस्टेरॉल आणि इतर सहव्याधी वाढू शकतात ज्यामुळे डायबेटीस असलेल्या व्यक्तींच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
घरगुती डिप्सचा आहारात समावेश करा
हे पदार्थ डायबेटीस असलेल्या व्यक्तींसाठी अनुकूल आहे की नाही याची खात्री करण्यासाठी केचपच्या बाटल्या आणि पॅकेजेस वर दिलेली त्यामधील घटकांची यादी नेहमी काळजीपूर्वक वाचण्याची शिफारस केली जाते. पण तज्ज्ञांनी असे सांगितले आहे की, डायबेटीस असलेल्या व्यक्तींसाठी एक चांगला आणि अधिक अनुकूल पर्याय म्हणजे घरच्या घरी स्वत:चे हेल्दी डिप्स बनवणे.
डॉ अटलुरी सुचवतात की, “ताज्या टोमॅटोंपासून बनवलेली चटणी, शेंगदाण्याची चटणी किंवा उच्च GI असलेली कंदमुळे वगळता इतर कोणत्याही नैसर्गिक भाज्यांपासून घरी बनवलेले डिप्स नेहमी खा.”
पोषणतज्ञ निधी निगम म्हणतात, डायबेटीस असलेल्या व्यक्तींसाठी नैसर्गिक आणि कमी कॅलरी असलेल्या अॅव्होकॅडो, टोमॅटो, नट आणि बिया इ. घटकांचा वापर करून हेल्दी डिप्स तयार करणे उत्तम आहे जे चवदार आणि आरोग्यदायी असतात.
याला जोडून आहारतज्ञ दीपलेख बॅनर्जी सांगतात की, “कमी ग्लायसेमिक इंडेक्ससह डायबेटीससाठी अनुकूल असलेले नैसर्गिक घटक निवडून अगदी सुरवातीपासून डिप्स बनवणे चांगले असते.”
आहारतज्ञ दीपलेखा बॅनर्जी या हुमस (चूणा डिप), ताहिनी (तीळ डिप), साल्सा (टोमॅटो, कांदे आणि मिरपूड वापरून मेक्सिकन डिप), मसूर आणि भाज्या-आधारित डिप्स असे आरोग्यदायी पदार्थ खाण्याचा सल्ला देतात. यापुढे त्या सांगतात की, “हे सर्व घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास आणि पचन प्रक्रियेस विलंब करण्यास मदत करतात ज्यामुळे शरीरात चांगले शोषण होण्यास मदत होते आणि इंसुलिनची संवेदनशीलता सुधारते.”
ओमेगा 3 फॅटी ऍसिड युक्त ताहिनी डिप बनवण्यासाठी तुम्ही तीळ भाजून त्याची पेस्ट करा आणि नंतर थोडे ऑलिव्ह ऑईल, लसूण, मीठ आणि लिंबाचा रस घाला आणि दह्याबरोबर एकत्र करा. हे थोडे कडू आणि आंबट डिप हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे आणि तिळामध्ये ओमेगा 3, 6 आणि 9 फॅटी ऍसिडचे संतुलित प्रमाण असते.
त्याचप्रमाणे, आणखी एक मध्य-पूर्व भागातील डिप म्हणजे हुमस यासाठी या पदार्थाच्या मूळ रेसिपीशिवाय अनेक आरोग्यपूर्ण पर्याय असू शकतात ज्यामध्ये उकडलेले चणे, लसूण, ताहिनी पेस्ट, ऑलिव्ह ऑईल आणि मीठ यांचा वापर करू शकतो.
डॉ. बॅनर्जी सांगतात की, याच्या पोषक विविधतांपैकी एक म्हणजे हिरव्या टोमॅटोचा हुमस करणे, हे भाजलेले हिरव्या टोमॅटोचा वापर करून बनवले जाते ज्यामध्ये भरपूर प्रमाणात ए जीवनसत्व असते. “हे पोटॅशियमचा एक चांगले स्त्रोत देखील आहे जे सोडियमचे परिणाम नियंत्रित करून ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवतात.”
त्याचप्रमाणे, इतर पौष्टिक आणि अँटिऑक्सिडंट समृद्ध डिप्स म्हणजे लाल शिमला मिरचीचा हुमस, बीट आणि कांद्याच्या पातीचा साल्सा, दही आणि चेरी टोमॅटोचे डिप आणि फ्लॉवर, चणे यांचे हुमस हे पदार्थांची चव वाढवण्यासाठी आणि पौष्टिक मूल्य संतुलित करण्यासाठी तयार करता येतात.
डॉ. निगम यांनी केचपऐवजी मेक्सिकोमधील पदार्थ म्हणजे कांदा, टोमॅटो, औषधी वनस्पती, कोथिंबीर,आणि अधिक चवीसाठी त्यामध्ये लिंबू पिळून ताज्या आणि तिखट साल्सा बनविण्याचा सल्ला दिला आहे.
मीठ, हिरवी मिरची आणि आमचूर पावडरसह धने आणि पुदिन्याची पाने एकत्र करून आणि नंतर त्यात दही घालून डायबेटिससाठी योग्य आणि स्नॅक्ससाठी चविष्ट असा आणखी एक आरोग्यदायी पदार्थ बनवता येतो. “हे डिप भाजलेले पापड, व्हेज स्टिक्स (गाजर आणि काकडी) आणि ग्रील्ड कबाब बरोबर खाता येते” असेही डॉ. निगम सांगतात.
सूण, मीठ, हिरवी मिरची आणि दही यांच्या मिश्रणात तीळ आणि अळशीच्या बिया एकत्र करून एक हेल्दी फॅट्स असलेल्या या डिपमध्ये आणखी एक सुपर हेल्दी डिप बनावता येते. हे देखील व्हेज स्टिक्स, मूग डाळ पापड, थेपला, मेथी खाखरा, मखना आणि भेळपुरी यांच्याबरोबर खाता येते.
डॉ. निगम यांचे म्हणणे आहे की, सुकामेवा आणि बियांनी युक्त डिप्स बनवल्यामुळे शरीराला प्रथिने आणि चांगले फॅट्स मिळतात आणि रक्तामधील साखर वाढणार नाही याची काळजी घेतली जाते. फक्त पॅकेजेस आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधून अनावश्यक कॅलरी मिळण्याऐवजी या पदार्थांमधून तुम्हाला स्नायू टिकवून ठेवण्यासाठी प्रथिने मिळतात.
त्या पुढे सुचवतात की, घट्ट दही आणि पनीरमध्ये हर्ब्स आणि सैंधव मीठ घालून एक प्रथिनयुक्त ह्युमस डिप तयार करा. “हे कुरकुरीत पोळ्यांबरोबर स्प्रेड म्हणून देखील खाल्ले जाऊ शकते.”
स्नॅक्स आणि योग्य डिप
तज्ञांच्या म्हणण्यानुसार, स्नॅक्स आणि डिप्स यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक आहे आणि दोन्हीपैकी एकही जास्त खाऊ नये.
“ब्रोकोली फ्रिटर्स, रोल्ड ओट्स नाचोस आणि बाजरी किंवा नाचणीचे चिप्स असे पदार्थ हे तेल कमी वापरण्यासाठी एअर फ्रायर वापरून तयार करता येतात,” असे डॉ. बॅनर्जी सुचवतात.
डॉ. दास म्हणतात की, दोन जेवणाच्या दरम्यान स्नॅक्सची खाणे हे योग्य आहे पण ते जेवणाच्या आधी किंवा नंतर खाणे योग्य नाही. डायबेटीस असणाऱ्या व्यक्तींना निरोगी राहण्यासाठी आणि अतिरिक्त कॅलरी बर्न करण्यासाठी चालणे आणि व्यायाम करणे देखील महत्त्वाचे आहे.
बोध
- डायबेटीस असलेल्या व्यक्ती या नैसर्गिक आणि कमी GI घटकांसह घरी पौष्टिक आणि आरोग्यदायी डिप्स बनवू शकतात.
- त्यांनी फायबर युक्त भाज्या, बिया आणि काजू यांचा आहारात समावेश केला पाहिजे आणि त्यांनी योग्य कमी-कॅलरी स्नॅक्स खाणे आवश्यक आहे जेणेकरून ते जास्त कॅलरी खाणार नाहीत.
- त्यांनी दोन जेवणाच्या दरम्यान स्नॅक्स आणि डिप्स योग्य प्रमाणात खाणे आवश्यक आहे.