
अनेक अभ्यासाअंती हा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे की, नियमित व्यायामामुळे मेंदूला फायदा होतो आणि अल्झायमरसारख्या(Alzheimer) न्यूरोजनरेटिव्ह परिस्थितीचा धोका कमी होतो.
या अभ्यासाच्या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल म्हणजे, यूएसएच्या मॅसॅच्युसेट्स जनरल हॉस्पिटलमधील संशोधकांनी हे शोधून काढले आहे की, स्नायूंद्वारे तयार होणारे इरिसिन हे हार्मोन मेंदूतील एंजाइम सोडण्यावर प्रभाव टाकते जे प्लेक्स साफ करते.
विशेषत: ते सांगतात की, व्यायामामुळे इरिसिन निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळते – जे मेंदूतील प्लेक्स साफ करते आणि अल्झायमर वाढण्यास प्रतिबंध करते.
अभ्यासाचे प्रमुख से हूं चोई यांच्या मते “सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला आढळून आले की, इरिसिन उपचारामुळे एमायलोइड बीटा पॅथॉलॉजीमध्ये [उंदीर आणि तयार मानवी पेशींमध्ये] लक्षणीय घट झालेली आहे. दुसरे म्हणजे मेंदूतील [अॅस्ट्रोसाइट] पेशींमधून स्रवलेल्या नेप्रिलिसिनच्या वाढलेल्या क्रियांमुळे इरिसिनचा हा परिणाम दिसून आला आहे.”
इरिसिन हार्मोन
याआधी केलेल्या अभ्यासामध्ये डॉ. हून चोई यांच्या टीमला असे आढळून आले होते की, इरिसिन हे अल्झायमरसाठी(Alzheimer) संभाव्य उपचारात्मक लक्ष्य असू शकते. सध्याच्या संशोधनामध्ये हे समोर आलेले आहे की, इरिसिन अॅस्ट्रोसाइट्सवर कसे कार्य करते आणि अमायलोइड बीटा प्लेक्स साफ करते ज्यामुळे अल्झायमरची लक्षणे कमी होतात.
आयरिसिन हार्मोन हे स्नायूंद्वारे स्त्रवते जे प्रामुख्याने ऊर्जा निर्माण करतात. हे शरीरातील चरबी-साठवणाऱ्या ऊतींना – पांढरे ऍडिपोज – ब्राऊन ऍडिपोज टिश्यूमध्ये रूपांतरित करण्यास प्रोत्साहन देते. ब्राऊन ऍडिपोज आणखी एक चरबीयुक्त टिश्यू आहे जे शरीराला उष्णता आणि ऊर्जा प्रदान करण्यासाठी जळते. अशा प्रकारे, विविध शारीरिक क्रिया करण्यासाठी अधिक ऊर्जा निर्माण करण्यास इरिसिन चालना देते.
इरिसिन प्लेक्सवर कसे कार्य करते
इरिसिन मेंदूतील प्लेक्स कसे कमी करते याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात संगणक मॉडेल आणि प्रगत इमेजिंग तंत्र वापरले. त्यांनी मेंदूतील पेशींच्या इतर घटकांसह हार्मोनचा परस्पर संबंध ओळखला.
त्यांना आढळले की, जेव्हा इरिसिनची पातळी वाढते तेव्हा ते मेंदूतील अॅस्ट्रोसाइट्स नावाच्या संरक्षक पेशी तयार होतात.या चांदणीच्या आकाराच्या पेशी असतात ज्या टाकाऊ पदार्थ साफ करण्यात आणि न्यूरॉन्सचे समर्थन आणि संरक्षण करण्यात मदत करतात.
जेव्हा अॅस्ट्रोसाइट्स सक्रिय होतात त्यावेळेस नेप्रिलीसिन नावाचे एंजाइम तयार होते. हे एन्झाइम मेंदूतील बीटा-अमायलोइडचे विघटन करते.
या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक रुडॉल्फ टॅन्झी सांगतात, “आमच्या निष्कर्षांमधून असे समोर आलेले आहे की, व्यायामामुळे वाढलेल्या नेप्रिलिसिनच्या पातळीत वाढ होण्यामध्ये इरिसिन हे एक प्रमुख मध्यस्थ आहे ज्यामुळे अॅमिलॉइड बीटा कमी होते, यामुळे अल्झायमर रोगाचा प्रतिबंध आणि त्याच्या उपचारांच्या उद्देशामध्ये हा एक नवीन मार्ग सापडलेला आहे. ”
या अभ्यासाचे निष्कर्ष शास्त्रज्ञांना अल्झायमर या आजारासाठी सुधारित उपचारात्मक लक्ष्ये विकसित करण्यात मदत करतात. या अभ्यासामध्ये न्यूरोडीजेनेरेटिव्ह परिस्थितीला सुरुवात होण्यास किंवा त्याच्या वाढीला विलंब करण्यासाठी व्यायाम करण्याच्या महत्त्वावर देखील भर देण्यात आलेला आहे.