728X90

728X90

0

0

0

विषयांवर चला

[shortcode_change_breadcrumb]
आहार आणि पोषण यांबद्दलच्या मिथकांचे खंडन करणे
5

आहार आणि पोषण यांबद्दलच्या मिथकांचे खंडन करणे

वैयक्तिक आरोग्य सेवेमध्ये पोषण हा सर्वात जास्त चर्चेचा विषय असताना अफवांच्या जाळ्यामधून चुकीची माहिती पसरली आहे जी उघड करणे आवश्यक आहे.
सेंट जॉन्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आणि पोषण विभागाच्या प्रमुख डॉ. रेबेका कुरियन राज
सेंट जॉन्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आणि पोषण विभागाच्या प्रमुख डॉ. रेबेका कुरियन राज

जगण्यासाठी अन्न हा मूलभूत घटक आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या गरजेनुसार ते अन्न तयार करणे हे  महत्त्वाचे आहे.

वैयक्तिक आरोग्य सेवेमध्ये पोषण हा सर्वात जास्त चर्चेचा विषय असताना अफवांच्या जाळ्यामधून चुकीची माहिती पसरली आहे जी उघड करणे आवश्यक आहे. सेंट जॉन्स रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आणि पोषण विभागाच्या प्रमुख डॉ. रेबेका कुरियन राज  यांनी 12 जुलै रोजी हॅपीएस्ट हेल्थच्या द एज ऑफ न्यूट्रिशन समिटमध्ये पोषणाच्या या मूलभूत गोष्टींकडे परत एकदा सजगपणे पाहण्याची गरज अधोरेखित केली. त्याचप्रमाणे निरोगी शरीरासाठी योग्य आहाराची निवड करण्याबाबत जागरूक असण्याची  गरजही त्यांनी  व्यक्त केली.

इथे त्यांनी सकस आहार आणि पोषण यांच्या संदर्भातील सामान्य मिथकांचा ज्ञानाच्या आधाराने प्रतिकार केला.

मिथक : अंड्यामधील पिवळ्या बलकामुळे कोलेस्ट्रॉल वाढते.

वस्तुस्थिती: अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते. पण  याचा अर्थ असा नाही की केवळ अंड्यातील पिवळा बलक खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते.त्यासाठी  संपूर्ण आहार महत्त्वाचा आहे.

मिथक : गरोदर महिलांनी दोन जीवांसाठी खाणे आवश्यक आहे.

वस्तुस्थिती: नाही. गर्भवती महिलेने किती आणि कोणत्या प्रमाणात अन्न खावे याचे काही मोजमाप नाही. निरोगी गर्भधारणेसाठी अन्नातील विविध पोषक घटक मिळणे महत्वाचे आहे. गर्भवती महिलेने सकस आहार घेणे महत्वाचे आहे.

मिथक : खेळाडूंनी प्रथिनांचे भरपूर सेवन करणे आवश्यक असते.

वस्तुस्थितीखेळाडूंना प्रथिनांची जास्त आवश्यकता असते पण योग्य प्रमाणात व्यायाम केल्याशिवाय प्रथिनांचा काही फायदा होत नाही.

मिथक फक्त भरपूर व्यायाम केल्यामुळे वजन कमी होते.

वस्तुस्थितीनाही,  आपला आहार आणि व्यायाम यांचे संतुलन राखले तर निश्चितच वजन कमी होते.

मिथक तुम्हाला व्यायामापूर्वी आणि व्यायामानंतर खाण्याची आवश्यकता असते.

वस्तुस्थितीहोय, जर एखाद्या व्यक्तीला व्यायामकडून स्नायू बळकट करायचे असतील तर व्यायामापूर्वीचा आणि नंतरचा आहार त्यांना पुरेशी ऊर्जा देतात जे तुम्हाला स्नायू बळकट करण्यात आणि टिकविण्यात मदत करतात.

मिथक : मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या व्यक्तींना केळी खाणे वर्ज्य असते.

वस्तुस्थिती: मूत्रपिंडाचा त्रास असलेल्या व्यक्ती केळी खाऊ शकतात पण एकूणच केळी खाण्याऐवजी संपूर्ण आहारातील पोटॅशियमच्या मात्रेवर बारीक लक्ष ठेवले पाहिजे.

 

तुमचा अनुभव/कमेंट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

0

0

0

ट्रेडिंग

लेख

लेख
भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.
लेख
पावसाळ्यात डेंग्यूचा ताप हा चिंतेचा विषय असतो. जर आपण आपल्या शरीराची काळजी घेतली नाही तर हा आजार खूप गंभीर असू शकतो.
लेख
चरबी कमी करण्यासाठी, आपण वापरता त्यापेक्षा जास्त कॅलरी बर्न करणे आवश्यक आहे. कमी कॅलरी खाऊन आणि जास्त व्यायाम करून हे करता येते.

Opt-in To Our Daily Newsletter

* Please check your Spam folder for the Opt-in confirmation mail

Opt-in To Our
Daily Newsletter

We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.