728X90

728X90

0

0

0

0

0

0

0

0

0

या लेखात

[shortcode_change_breadcrumb]
वाईट सुरुवात: ब्रेकफास्ट न केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य बिघडू शकते
133

वाईट सुरुवात: ब्रेकफास्ट न केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य बिघडू शकते

बहुतेक घरांमध्ये पहाटेची वेळ सहसा धावपळीची असते. गजराचे घड्याळ अनेक वेळा स्नूझ केल्यानंतर तुम्हाला कामावर जाण्यासाठी उठावे लागते
ब्रेकफास्ट न केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य बिघडू शकते
ब्रेकफास्ट न केल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य बिघडू शकते

दिवसाचे पहिल्या जेवणाचे सेवन न केल्याने  लठ्ठपणा, उच्च कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.

बहुतेक घरांमध्ये पहाटेची वेळ सहसा धावपळीची असते. गजराचे घड्याळ अनेक वेळा स्नूझ केल्यानंतर तुम्हाला कामावर जाण्यासाठी उठावे लागते आणि त्यानंतर कधीही न संपणाऱ्या ट्रॅफिकमध्ये ऑफिसला जावे लागते, अशावेळी सकस ब्रेकफास्ट मिळणे ही शेवटची गोष्ट आहे जी एखाद्याच्या मनात येते. धावपळीच्या जीवनात नाश्ता न करणे हे अगदी सामान्य झाले आहे. तथापि, असे नियमितपणे केल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ब्रेकफास्ट हे बहुतेक वेळा दिवसाचे सर्वात महत्त्वाचे जेवण मानले जाते आणि अनेक अभ्यासातून असे निदर्शनास आलेले आहे की, ते न केल्याने हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.

ब्रेकफास्ट करणे का महत्वाचे आहे?

हैदराबादच्या न्यूट्रीक्लिनिकच्या संस्थापक आणि सल्लागार पोषणतज्ञ, दीपा अग्रवाल म्हणतात, “चयापचय सुधारणे आणि ऊर्जा प्रदान करण्यासोबतच ब्रेकफास्ट केल्यामुळे  स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील वाढते. हे लो-डेन्सिटी लिपोप्रोटीनची [LDL] पातळी कमी करण्यास, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित समस्यांचे प्रादुर्भाव कमी करण्यात आणि वजन कमी करण्यात मदत करते. याच्या सेवनामुळे स्नायू आणि मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक असलेली रक्तातील साखर देखील भरून काढते.”

हैदराबादमधील अन्न शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ पोषण सल्लागार ज्योती छाब्रिया म्हणतात, ब्रेकफास्ट ही शरीराला ऊर्जा देण्यास मदत करते. ब्रेकफास्ट न केल्यामुळे तुमची चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे वजन वाढते. “जेव्हा तुमचे वजन वाढते, तेव्हा तुमचे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइडचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. त्याचा हृदयावर परिणाम होतो,” असे राष्ट्रीय पुरस्कार विजेते पोषणतज्ञ चब्रिया म्हणतात.

ब्रेकफास्ट न करण्याचे धोके

२०१९ मध्ये अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात अमेरिकेतील तिसऱ्या राष्ट्रीय आरोग्य आणि पोषण परीक्षा सर्वेक्षणाचा (एनएचएएनईएस III) भाग म्हणून संभाव्यतः ६५५० प्रौढांचे मूल्यमापन केले गेले आणि असे आढळून आले की, ज्या व्यक्ती ब्रेकफास्ट करत नाहीत त्यांच्यामध्ये एथेरोस्क्लेरोसिस विकसित होऊन  हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताने मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.

इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, ओएसएफ हेल्थकेअर कार्डिओव्हस्कुलर इन्स्टिट्यूट, अर्बाना, यूएसच्या डॉ अला उजायली  म्हणतात, “ ज्या लोकांना सकस अन्न न खाण्याच्या सवयी आहेत ते ब्रेकफास्ट करत नाहीत, भूक लागल्यानंतर ते जास्त कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याचा संभव असतो. यामुळे शरीराचे वजन आणि रक्तदाब वाढतो, जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी स्थितीसाठी जोखीम असलेले घटक आहेत.”

एक इलिनॉय-आधारित कार्डियाक नर्स प्रॅक्टिशनर,अंबर किंगरी  म्हणतात की,  ब्रेकफास्ट न केल्यामुळे खाण्याच्या वाईट सवयी वाढू शकतात.  त्या असेही  नमूद करतात की, अभ्यासातून असे दिसून आले आहे  जे लोक ब्रेकफास्ट करत नाहीत, रात्रीचे जेवण अनियमित वेळी करतात, जास्त वेळा अपायकारक अन्नाचे सेवन तसेच अस्वास्थ्यकर लाल आणि प्रक्रिया केलेले मांस खातात त्यांची शारीरिक हालचाल आणि ऊर्जा कमी असते.

आहाराचे सेवन न करणे आणि उपवास करणे

जर्नल ऑफ द अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्समध्ये नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की ब्रेकफास्ट न करणे हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी स्थितीमुळे येणाऱ्या मृत्यूच्या उच्च जोखमीशी संबंधित आहे. हॅपीएस्ट हेल्थशी झालेल्या ई-मेल संवादामध्ये अभ्यासाचे यूएस-स्थित प्रमुख लेखक, डॉ यांगबो सन म्हणतात की, हा अभ्यास आहाराचे सेवन न करण्याबद्दल आहे, इन्टमिटन्ट फास्टिंग कारण्याबद्दलचा नाही.

ते स्पष्ट करतात की, “आहाराचे सेवन न करणे आणि इन्टमिटन्ट फास्टिंग करणे या दोन भिन्न संकल्पना आहेत. इन्टमिटन्ट फास्टिंग करणे ही एक वेळ-प्रतिबंधित आहार पद्धती आहे ज्यामध्ये सर्व खाद्यपदार्थ आणि कॅलरी-युक्त पेये यांचे सेवन दररोज एका ठराविक काळामध्ये [उदाहरणार्थ, आठ तास]मर्यादित करणे याचा समावेश असतो. तथापि, आमच्या अभ्यासात जेवण न करणे हे सहभागींनी ‘जेवण’ न करणे म्हणून नोंदवले होते, याचा अर्थ त्यांनी विशिष्ट किंवा एक जेवण वगळले असेल परंतु त्याऐवजी इतर कोणत्याही वेळी आहाराचे सेवन केलेले असेल. त्यामुळे, आमच्या अभ्यासाची इन्टमिटन्ट फास्टिंगच्या अभ्यासाशी थेट तुलना होऊ शकत नाही.”

छाब्रिया सांगतात की, इन्टमिटन्ट फास्टिंग करणे शरीराला एकदातरी डिटॉक्स करण्यासाठी चांगले असले तरी, चांगल्या आरोग्यासाठी वैयक्तिकरित्या त्या दिवसभरात सहा लहान जेवण घेण्याची शिफारस करतात.

डॉ. उजयली पुढे सांगतात की, मधुमेह किंवा हृदयाच्या समस्यांसारख्या कॉमोरबिडीटी असलेल्या लोकांनी त्यांना आवश्यक असलेल्या उष्मांकाचे सेवन व्यवस्थित करणे आवश्यक आहे. “इतर निरोगी लोकांसाठी, माझा विश्वास आहे की, तुम्ही तुमच्या शरीराचे ऐकले पाहिजे. जर तुम्हाला सकाळी ९वाजता भूक लागली असेल, तर सकाळी ७ वाजल्यापासून या गोष्टीसाठी तुम्ही तयार असणे आवश्यक आहे त्यामुळे अपायकारक आहार घेण्याआधी आणि तुमचा मेंदू तुम्हाला द्विधा मन:स्थितीकडे ढकलण्याआधी तुम्ही तुमची उष्मांकाची गरज भागवणे चांगले होईल,” असे ही त्यांनी सांगितले.

निरोगी हृदयासाठी ब्रेकफास्ट

डॉ. अग्रवाल म्हणतात की, दिवसाच्या सुरुवातीला तुमच्या हृदयाला चालना देण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे पोषक तत्वांनी भरलेली, हृदयासाठी निरोगी ब्रेकफास्ट करणे.  प्रत्येक पाच अन्न गटातून (फळे, भाज्या, धान्ये, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि दुग्धजन्य पदार्थ) संपूर्ण आणि प्रक्रिया न केलेले पदार्थ निवडण्याचा सल्ला त्या देतात ज्यामध्ये याचा समावेश असतो:

  • प्रथिनांसाठी अंडी, ग्रीक दह्याचे प्रकार (कमी साखर असलेले) आणि शेंगा
  • चांगल्या स्निग्ध पदार्थांसाठी सुकामेवा, ऑलिव्ह ऑइल आणि एवोकॅडो
  • फायबर आणि कर्बोदकांसाठी संपूर्ण धान्य, भाज्या आणि फळे

छाब्रिया यांच्या म्हणण्यानुसार, ज्यांना हृदयासाठी निरोगी ब्रेकफास्ट करण्यासाठी वेळ मिळत नाही ते किमान इतर पर्याय जसे की सुकामेवा किंवा काही फळे यांचे सेवन करून त्यांची चयापचयाची क्रिया सुरू करू शकतात.  पोट कधीही रिकामे न ठेवण्याचा सल्ला त्या देतात. “नाश्ता राजाप्रमाणे करा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण गरीबांसारखे करा.” या अमेरिकन लेखिका अॅडेल डेव्हिस यांच्या म्हणण्याला त्यांनी अनुमोदन दिलेले आहे.

बोध

  • नियमितपणे ब्रेकफास्ट न केल्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
  • तज्ञांचे म्हणणे आहे की, ब्रेकफास्ट न केल्यामुळे लठ्ठपणा, कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, अयोग्य आहाराचे सेवन आणि रक्तदाब वाढू शकतो, जे हृदयाच्या स्थितीसाठी जोखीमीचे घटक आहेत.
  • निरोगी हृदयासाठी दिवसाच्या सुरुवातीस ब्रेकफास्ट करणे हा तुमच्या हृदयाला चालना देण्याचा उत्तम मार्ग आहे.

 

तुमचा अनुभव/कमेंट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेडिंग

लेख

लेख
भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.
लेख
केस कापल्यास लवकर वाढतील, एक केस पांढरा झाला कि बाकीचे केस पांढरे होतात, रोज केस धुवू नयेत. हे सगळं खरं आहे का?
लेख
तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेवल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. छातीत जळजळ आणि अपचन यासारख्या समस्या टाळण्यासाठी हे करा
लेख
सायकल चालविणे आणि चालणे या दोन्ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रिया आहेत ज्या वजन कमी करण्यास मदत करतात आणि आरोग्याचे  विविध आजार दूर ठेवतात.
लेख
थायरॉईड  शरीरातील आवश्यक आणि महत्त्वपूर्ण रसायने बनवण्यास मदत करते.  ही रसायने आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कामांवर नियंत्रण ठेवतात.
लेख
आपल्या चटणीतील लसूण आपले रक्ताभिसरण आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. हे वजन कमी करण्यास मदत करते

0

0

0

0

0

0

0

0

0

Opt-in To Our Daily Newsletter

* Please check your Spam folder for the Opt-in confirmation mail

Opt-in To Our
Daily Newsletter

We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.