
जागतिक स्तरावर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आजार पसरण्यात आरोग्यास हानिकारक असलेली चरबी आणि ट्रान्स-फॅट्स, प्रामुख्याने अल्ट्रा-प्रोसेस्ड जंक फूड अति प्रमाणात खाणे हे जबाबदार आहे. तज्ज्ञांनी सांगितले आहे की योग्य व्यायाम आणि हृदयासाठी योग्य आहार घेणे हे तुमचे हृदय निरोगी ठेवण्याचे सर्वात सोपे आणि प्रभावी मार्ग आहेत.
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या पोषणतज्ञ पलक टी पुनमिया सांगतात की, खाण्याच्या आणि स्नॅकिंगच्या योग्य सवयी असणे महत्त्वाचे आहे कारण आपण खातो त्या प्रत्येक लहान गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो.
सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅट्स किंवा जास्त मीठ यांसारखे अपायकारक अन्न घटक खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो. या पदार्थांमुळे लठ्ठपणा आणि डायबेटीस देखील होऊ शकतो ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
मुंबई येथील एसआरव्ही हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ञ सल्लागार, डॉ. जयदीप राजेबहादूर यांच्या मते, “सकस आहारामध्ये काही वेळेस चिकन, मासे आणि अंडी यांसारख्या मांसाहारी पदार्थ खाण्याबरोबरच हिरव्या भाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य यांचे संतुलन असणे आवश्यक आहे.”
निरोगी हृदयासाठी तुम्ही पुढील पदार्थ खाणे टाळावेत
१. लाल मांस
चेन्नई येथील फोर्टिस मलर हॉस्पिटलमधील कार्डिओथोरॅसिक व्हॅस्कुलर सर्जन डॉ थेजस्वी एन मारला सांगतात की, लाल मांस हे हृदयासाठी चांगले नसते कारण त्यामध्ये एलडीएस (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन्स किंवा वाईट कोलेस्ट्रॉल) आणि ट्रायग्लिसराइड्स (एक प्रकारची चरबी) असतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, लाल मांस खाल्ल्याने दीर्घकाळ तुमच्या हृदयावर परिणाम होऊ शकतो. “तुम्ही त्याऐवजी चिकन किंवा मासे खाऊ शकता कारण त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्स यांचे चांगले प्रमाण असते” असे डॉ. राजेबहादूर म्हणतात.
यापुढे डॉ. मारला सांगतात की, कोणतेही मांसाहारी पदार्थ खाताना फक्त मांस खाण्याची आणि प्राण्याची त्वचा आणि इतर अवयव न खाण्याची शिफारस केली जाते कारण त्यांच्यामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असते.
२. ब्रेड आणि इतर बेकरी पदार्थ
डॉ. पुनमिया सांगतात की, बेक्ड पदार्थ घरी बनविणे हा एक चांगला पर्याय आहे पण जेव्हा तुम्ही हे पदार्थ विकत आणता तेव्हा त्यावर प्रक्रिया केकेली असते आणि ते त्यामध्ये मैद्याचा वापर केलेला असतो जो आरोग्यासाठी हानिकारक असतो आणि त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण देखील जास्त असते. “त्याऐवजी होल ग्रेन ब्रेड, ब्राउन ब्रेड किंवा आटा फ्री ब्रेड आपण खाऊ शकतो,” असे डॉ. राजेबहादूर म्हणतात.
तज्ञ सल्ला देतात की, ब्रेड आणि इतर बेकरी पदार्थ खाण्याचे टाळणे चांगले असते. “ब्रेडअधिक काळ टिकण्यासाठी आणि ते अधिक मऊ होण्यासाठी त्यामध्ये क्षार आणि इतर घटक मिसळले जातात” असे डॉ. मारला म्हणतात. यापुढे ते म्हणतात की, यामुळे तुमच्या नियमित पचन क्रियेत व्यत्यय येतो आणि तुमच्या शरीरावर आणि पचन क्रियेवर दीर्घकाळापर्यंत परिणाम होतो.
३. आईस्क्रीम आणि चॉकलेट्स
आईस्क्रीम आणि चॉकलेट्समध्ये साखर, कार्बोहायड्रेट्स आणि वाईट चरबीचे प्रमाण जास्त असते. डॉ राजेबहादूर म्हणतात की, “यापैकी बहुतेक अपायकारक कॅलरीज (थोडे किंवा कोणतेही पौष्टिक मूल्य नाही) असतात ज्या बर्न करणे कठीण असते आणि कालांतराने त्यांचा तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो”. यापुढे ते सांगतात की, चॉकलेट्स किंवा आईस्क्रीम अधूनमधून खाणे ठीक आहे, पण हे पदार्थ तुमच्या खाण्याच्या सवयी किंवा आहाराचा भाग असू नये.
डॉ. मारला पुढे म्हणतात की, महिन्यातून एकदा आईस्क्रीमचा एक स्कूप खाणे ठीक आहे. डॉ. पुनामिया म्हणतात, “हे खाण्याचे प्रमाण कमी ठेवणे चांगले असले तरी ते पॅक केलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न न खाणे केव्हाही चांगले आहे.”
४. तेल
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या तेलांमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते ते न खाणे चांगले आहे. उदाहरणार्थ, खोबरेल तेल ज्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट जास्त असते आणि ते तुमच्या शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी देखील वाढवू शकते. “हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींसाठी कोल्ड प्रेस्ड ऑइल (चांगले कोलेस्टेरॉलची पातळी वाढवते (HDL)) हा एक चांगला पर्याय आहे,” असे डॉ. पुनमिया म्हणतात.
पण डॉ. मारला यांच्या मते कोणतेही तेल काही प्रमाणात वाईट असते आणि चांगले तेल असे काही नसते. ते पुढे म्हणतात की, स्वयंपाकासाठी कोणतेही तेल वापरायचे असेल त्याचे प्रमाण मर्यादित असावे.
५. मीठ
तज्ञ सांगतात की, आम्ही मिठाचा वापर शक्य तेवढा कमी करण्याचा सल्ला देतो. पूर्वीपासून हृदयाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी देखील हे योग्य नाही. डॉ. मारला म्हणतात, “मीठाचा कमीत कमी वापर केला पाहिजे कारण मिठातील सोडियम क्लोराईडमुळे रक्तवाहिन्यांना न सुधारता येणारे नुकसान होते.”
डॉ. पुनमिया पुढे सांगतात की, हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी सोडियम खाणे टाळले पाहिजे, त्यांनी अन्न किंवा फळांमध्ये चवीसाठी मीठ घालू नये आणि त्याऐवजी ओरेगॅनो, लिंबाचा रस, काळी मिरी किंवा थोडा व्हिनेगर यांसारख्या औषधी पदार्थांचा वापर करणे चांगले आहे.
६. फ्रोजन, पॅक केलेले आणि फास्ट फूड
“आपण जे फास्ट फूड, पॅक केलेले आणि फ्रोझन फूड खरेदी करतो, त्यामध्ये MSG (मोनोसोडियम ग्लुटामेट/ अजिनोमोटो) असते” असे डॉ. पुनमिया म्हणतात. त्या यापुढे सांगतात की, साठवण केलेल्या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाणही भरपूर असते जे हृदयासाठी वाईट असते.
पॅक केलेले अन्न, पॅकेज केलेले ज्यूस, कॅन केलेले अन्न, सॉल्टेड बटर, फास्ट फूड, प्रक्रिया केलेले चीज आणि फ्रोजन मांस खाणे टाळावे कारण त्यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही जास्त असते. सॉस आणि लोणचे खाणे देखील टाळणे चांगले असते. “अन्नाचे हे पर्याय कधीही चांगले नाही कारण त्यात मिठाचे प्रमाण किंवा इतर संरक्षक घटकांचे प्रमाण जास्त असते त्यामुळे हे पदार्थ अत्यंत अपायकारक असतात” असे डॉ. राजेबहादूर म्हणतात.
७. कंदमुळे प्रकारातील भाज्या
तज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, टॅपिओका, बटाटा, रताळे यांसारख्या बहुतेक कंदमुळांमध्ये कर्बोदक आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणून, सामान्यतः हे पदार्थ खाणे टाळण्याची शिफारस केली जाते. डॉ. मारला म्हणतात, “एखाद्या व्यक्तीला आहारात हे पदार्थ पूर्णपणे टाळणे शक्य नसेल तर भाजलेले आणि न तळता खाणे चांगले असते.” ते पुढे सांगतात की, हे पदार्थ एखाद्या व्यक्तीच्या आहाराचा मुख्य भाग असू शकतो, म्हणून आम्ही शिफारस करतो की, त्यांनी हे पदार्थ तळून न खाता उकडलेल्या स्वरूपात खावेत.
८. साखर
डॉ. राजेबहादूर सांगतात की, जास्त साखर असलेला कोणताही अन्न पदार्थ खाण्याची शिफारस केली जात नाही कारण त्याचा आपल्या हृदयाच्या आरोग्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. साखरयुक्त पेये आणि साखरयुक्त पदार्थ खाणे देखील टाळावे.
“साधी साखर (साधी कार्बोहायड्रेट) जसे गूळ, फ्रक्टोज, कॉर्न सिरप आणि साखर हे खाणे टाळले पाहिजे,” असे डॉ. पुनमिया म्हणतात. त्याऐवजी, संपूर्ण धान्य, भाज्या यांसारख्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा आहारात समावेश केला पाहिजे असं त्या सांगतात.
One Response
फार महत्त्व पुर्ण माहिती आहे