
बद्धकोष्ठता ही अशी स्थिती आहे जिथे एखाद्या व्यक्तीला मलावरोध होतो आणि शौचास अडचण येते. वर्ल्ड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी ऑर्गनायझेशन (WGO) यांच्या मते बद्धकोष्ठता एक लक्षण आहे, आरोग्य संबंधीची स्थिती नाही. शौचास ताण येणे, कठीण गोळ्यासारखा मल, क्वचितच शौचास जाणे किंवा नियमित शौचास न होणे यासारखी विविध प्रकारची लक्षणे असू शकतात, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर मलविसर्जनाच्या पद्धतीमध्ये काही बदल झाला असेल तर ही चिंतेची बाब आहे.
बद्धकोष्ठतेबद्दल येथे अधिक वाचा.
आयुर्वेदामध्ये दिलेले स्पष्टीकरण
बेंगळुरू येथील आयुर्वेदिक चिकित्सक डॉ विश्वनाथ चट्टी म्हणतात की, आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बद्धकोष्ठतेला विबंध (बद्धकोष्ठतेसाठी संस्कृत शब्द) किंवा मल विबंध असे संबोधतात. वात (वाताचे घटक) हे पाच प्रकारचे असतात. त्यातील एक अपन वात (मूत्र आणि विष्ठेच्या उत्सर्जनासाठी जबाबदार) आहे, जेव्हा याचे संतुलन बिघडते तेव्हा बद्धकोष्ठता निर्माण होते असे डॉ. चट्टी सांगतात.
आयुर्वेदिक तज्ञांच्या सांगण्यानुसार, कोरडे, अतिप्रक्रिया केलेले पदार्थ खाणे, पाण्याचा अभाव, उपवास, शारीरिक हालचालींचा अभाव, रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि वृद्धत्व यासारख्या विविध कारणांमुळे बध्दकोष्ठतेचा आजार उद्भवतो.
आयुर्वेदिक तज्ञांनी सांगितलेले उपाय
बद्धकोष्ठतेचे कारण हे प्रत्यके व्यक्तीनुसार बदलू शकते. बद्धकोष्ठतेला कारणीभूत असलेल्या सवयी बदलल्या तर हा त्रास टाळता येतो असे डॉ. चट्टी सांगतात.
सकस आहाराच्या सवयी अंगीकारणे जसे की भूक लागल्यावर खाणे, मोजके खाणे, आहाराची जाणीवपूर्वक निवड करणे, हंगामात उपलब्ध असलेले अन्न खाणे, आयुर्वेदिक दैनंदिन दिनचर्याचे पालन करणे, व्यायाम करणे आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे ही अनारोग्याची परिस्थिती, विशेषतः बद्धकोष्ठता टाळण्याची गुरुकिल्ली आहे.
पाणी पिण्याच्या आयुर्वेदिक दृष्टिकोनाबद्दल येथे अधिक वाचा.
राष्ट्रीय आरोग्य पोर्टल (NHP) कडून दिलेल्या अतिरिक्त शिफारसी
- दिवसातून कमीतकमी ३० मिनिटे चालणे.
- आहारात फायबरयुक्त पदार्थ जसे की कडधान्ये, संपूर्ण धान्य, फळे आणि ब्राऊन राइस यांचा समावेश करणे.
- शौचाला जाण्याची वेळ टाळू नये.
- आतड्याची हालचाल नियमित करण्यासाठी आणि मलाला प्रवृत्त करण्यासाठी दररोज एकाच वेळी किमान 10 मिनिटे वॉशरूममध्ये बसणे.
बद्धकोष्ठतेसाठी नेहमी रेचक किंवा शुध्दीकरणाची गरज नसते.
पचनाची आणि शोषून घेण्याची क्रिया सुरळीत करण्याची आवश्यकता असते असे डॉ. चट्टी सांगतात. प्रत्येक व्यक्तीला रेचक किंवा शुध्दीकरणाची गरज नसते. बद्धकोष्ठता थांबविण्यासाठीचा पहिला पर्याय म्हणजे बैठ्या किंवा गतिहीन जीवनशैलीत बदल करणे.
वनौषधींबद्दल बोलताना, डॉ चट्टी म्हणतात, “स्वतः औषधोपचार करू नका किंवा माहिती नसताना घरगुती उपचार करू नका त्यासाठी डॉक्टरांना भेटा आणि त्यांची मदत घ्या.”
घरगुती उपचारांच्या मर्यादांबद्दल येथे अधिक सांगितलेले आहे.
निसर्गोपचाराच्या दृष्टिकोनातून
एमव्हीएम कॉलेज ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्सेस, बेंगळुरू येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ विनुथा राव यांनी हॅपीएस्ट हेल्थशी बोलताना सांगितले की, बद्धकोष्ठता हे सर्व आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित स्थितीचे मूळ कारण आहे असे म्हटले जाते.
जीवनशैलीचे उपाय आणि आहार
डॉ. राव सल्ला देतात,
- आहारात स्निग्ध पदार्थांचा समावेश करा.
- भरपूर पाणी प्या.
- योगासने आणि चालणे यासारख्या शारीरिक क्रिया वाढवा.
- आवेगाला थांबवू नका.
- काळजी आणि तणाव कमी करा.
- धूम्रपान, कॅफिन आणि मद्यपान टाळा.
काही घरगुती उपाय करून पहा
- एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध घालून पिणे.
- झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये एरंडेल तेलाचे काही थेंब टाकून ते पाणी पिणे.
- सकाळी अनोश्या पोटी अर्धा कप कोरफडीचा रस पिणे.
- एक ग्लास ताकामध्ये चिमूटभर हिंग टाकून ते पिणे.
डॉक्टरांना भेटणे आणि त्यांच्याकडून औषध घेणे नेहमीच योग्य असते.
आवश्यक असल्यास निसर्गोपचार तज्ञ हे हायड्रोथेरपीचा सल्ला देतात. शिवाय, डॉक्टरांनी सांगितल्यानुसार कोलन हायड्रोथेरपी आणि एनीमा देऊन बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करता येतो.
व्यायामाचे महत्व
डॉ. राव यांच्या म्हणण्यानुसार, व्यायामामुळे आतड्यांचे पेरिस्टाल्टिक कार्य वाढते आणि पेल्विक आणि पोटाचे स्नायू मजबूत होतात. अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचे व्यायाम हे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास मदत करतात.
योग मुद्रा
तज्ञांचा असा विश्वास आहे की, योगासनांमुळे पचनशक्ती आणि आतड्यांचे कार्य सुधारते. बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी डॉ राव यांनी शिफारस केलेली काही योगासने पुढील प्रमाणे आहेत:
- पश्चिमोत्तानासन (पुढे वाकलेल्या स्थितीत बसणे)
- हलासन (नागरासारख्या आकाराची स्थिती)
- धनुरासन (धनुष्यासारखी स्थिती)
- शलभासन (टोळ सारखी स्थिती)
- भुजंगासन (कोब्रा सारखी स्थिती)
- प्राणायाम भस्त्रिका (खालील श्वास) आणि अनुलोमा-विलोमा (दोन्ही नाकपुड्यांनी आळीपाळीने श्वास घेणे)
- योग मुद्रा (हाताच्या मुद्रा)
पोषणतज्ञांनी केलेल्या शिफारसी
युनिव्हर्सल डायट अॅकॅडमी अँड क्लिनिक, मोहाली, पंजाब येथील पोषणतज्ञ साक्षी गांधी यांनी काही पर्याय सुचविलेले आहेत.
- पाण्यात भिजवलेल्या किंवा नुसत्या (तीन ते चार) काळ्या मनुका दररोज सकाळी खाणे.
- दररोज सकाळी भिजवलेले चिया सीड्स खाणे.
- सकाळच्या नाश्त्यामध्ये ओट्स किंवा भरड धान्याचा समावेश करणे.
- फायबरयुक्त आहार वाढविणे.
- झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा साजूक तूप घालून ते पाणी पिणे.
- तळलेले, भाजलेले आणि फ्रोजन पदार्थ खाण्याचे टाळणे.