
देशात डेंग्यूच्या रुग्णांची खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, अश्यातच चुकीच्या चाचण्यांच्या निकालांबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. डेंग्यूच्या आजाराची सामान्य लक्षणे दिसणाऱ्यांमध्येही डेंग्यू चाचणीचे खोटे- नेगेटिव्ह रिपोर्ट आल्याची उदाहरणे डॉक्टरांच्या निदर्शनास आली आहेत.
कोविडच्या काळात अनेक चाचण्या करण्यात आल्या पण त्याकाळात देखील खोट्या रिपोर्टची समस्या दिसून आली आणि यामुळे संभ्रम निर्माण झाला. आणि असे काही चुकीचे-नकारात्मक परिणाम देखील असतात जेव्हा एखादी चाचणी त्या व्यक्तीला संक्रमित असूनही व्हायरस शोधत नाही, परिणामी सकारात्मक अहवालाऐवजी नकारात्मक अहवाल येतो.
डेंग्यू(Dengue) आजारावर अजून कोणतेही उपचार नसल्याने आणि लक्षणात्मक उपचारांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे अनेक खऱ्या डेंग्यू प्रकरणांचे रोगनिदान आणि उपचारांवर फारसा परिणाम होत नाही, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
बंगळुरू येथील एका पाच वर्षांच्या मुलाला घसा खवखवणे, डोकेदुखी,ताप, मायल्जिया(myalgia), भूक न लागणे अशी लक्षणे नुकतीच जाणवली. त्याला पॅरासिटामॉल आणि लोझेंजसारखी तोंडी औषधे लिहून देण्यात आली, परंतु पाच दिवसांनंतरही लक्षणे कमी झाली नाहीत, ज्यामुळे त्याच्या पालकांनी पुढील उपचार घेतले.
बेंगळुरूच्या आत्रेय हॉस्पिटलचे(Athreya Hospital, Bangalore) संस्थापक आणि वैद्यकीय संचालक डॉ. नारायणस्वामी एस(Dr Narayanaswamy S) सांगतात, “मुलाला तीव्र मायल्जियामुळे चालण्यास त्रास झाला आणि तो डिहायड्रेट देखील झाला. त्याच्या या लक्षणांमुळे त्याला डेंग्यू ची लागण झाल्याचे दिसून आले आणि त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु क्लिनिकल संशयाच्या उलट डेंग्यू शोधण्यासाठी करण्यात आलेल्या रॅपिड आणि एलिसा या दोन्ही चाचण्यांमध्ये मुलाच्या रक्ताचे नमुने डेंग्यूसाठी निगेटिव्ह आले.
एलिसा(ELISA) – एक स्क्रीनिंग चाचणी आहे जी रोगजनकांविरूद्ध अँटीजेन आणि / किंवा अँटीबॉडीची उपस्थिती शोधते – डेंग्यूसाठी सर्वात विशिष्ट चाचणी असल्याचे म्हटले जाते.
दाखल करण्यात आलेल्या मुलाच्या सर्व ब्लडमध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. सामान्य दीड ते पाच लाख प्लेटलेट्सच्या तुलनेत त्यांच्याकडे एक लाख प्लेटलेट्स होते. आणि त्याच्या पांढऱ्या पेशी (डब्ल्यूबीसी) सामान्य 4,500 ते 11,000 डब्ल्यूबीसी प्रति मायक्रोलिटरच्या तुलनेत 1,000 पेक्षा कमी होत्या.
या मुलाच्या केसमध्ये मुलाला डेंग्यू किंवा डेंग्यूसारखा ताप असू शकतो, पण मुलाला रक्तसंचय देखील होता.
निदान अज्ञात उत्पत्तीचा ताप होता. मुलावर लक्षणात्मक उपचार करण्यात आले ज्यात आयव्ही(IV) द्रव आणि वेदनाशामक(पेनकिलर) औषधांचा समावेश होता. डेंग्यू बरा होण्यासाठी पोषण खूप महत्वाचे आहे, डेंग्यू-तापाच्या आहारात कमी चरबी आणि उच्च द्रव पदार्थांचे सेवन आवश्यक आहे.
चुकीच्या नेगेटिव्ह रिपोर्टमुळे काय होते?
सॅनेटिव्ह हेल्थकेअर, दिल्लीच्या सल्लागार संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. छवि गुप्ता यांच्या मते, खोट्या- नेगेटिव्ह रिपोर्टना कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये चाचणीतील त्रुटी, नमुने गोळा करणे, चाचणी किटची अचूकता आणि वापरल्या जाणाऱ्या डेंग्यू अँटीजेन आणि डेंग्यू अँटीबॉडीची गुणवत्ता यांचा समावेश आहे.
डॉ. गुप्ता म्हणतात, “सुरुवातीच्या पाच दिवसांत हा विषाणू शरीरात फिरत असतो, त्यामुळे त्याचे अँटीजेन निदान करावे लागते. त्यानंतर अँटीजेन कमी होते आणि अँटीबॉडी वाढते. त्यामुळे रॅपिड टेस्टिंग किटचा वापर हुशारीने केला पाहिजे.
डेंग्यू विषाणूविरूद्ध आयजीएम(IgM) आणि आयजीजी(IgG) प्रतिपिंडांची उपस्थिती संसर्गाचे सूचक आहे. IgM ऍन्टीबॉडीज म्हणजे व्यक्तीला आता झालेला संसर्ग, आणि IgG ऍन्टीबॉडीज म्हणजे त्या व्यक्तीला अलीकडच्या काळात संसर्ग झाला होता.
मुंबईच्या मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलचे(Wockhardt Hospitals) इंटरनल मेडिसिन कन्सल्टंट डॉ. अनिकेत मुळे सांगतात, “परिस्थितीनुसार काळजीपूर्वक चाचण्या घ्याव्या लागतात. ‘चाचणीचा दिवसही महत्त्वाचा आहे. सुरुवातीच्या काळात अँटीबॉडी चाचण्या मागवल्या आणि अँटीबॉडी तयार होण्यास पाच ते सात दिवसांचा कालावधी लागला तर तो खोटा नेगेटिव्ह देऊ शकतो.
एनएस 1 अँटीजेन चाचणीमध्ये, संसर्ग केवळ सुरुवातीच्या टप्प्यात – म्हणजे लक्षणे दिसल्यानंतर सुरुवातीच्या सात दिवसांत चाचणी केल्यासच आढळतो.
डॉ. गुप्ता म्हणतात, “कोणती चाचणी वापरायची याची माहिती नसल्यामुळे आणि लॅबमधील काही तांत्रिक त्रुटींमुळे (रॅपिड टेस्ट केल्यास) खोटे-निगेटिव्ह रिपोर्ट येऊ शकतात.” जर संशय खूप जास्त असेल तर मान्यता प्राप्त एलिसा कीटद्वारे पुष्टी चाचणी केली जाऊ शकते.
रिपोर्ट काहीही असला तरी खोटे नेगेटिव्ह आल्यास लक्षणात्मक उपचार केले जातात, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
बोध
♦ डेंग्यूच्या खोट्या- नेगेटिव्ह रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.
♦चुकीचे-नकारात्मक रिपोर्ट म्हणजे जेव्हा एखादी टेस्ट त्या व्यक्तीला संक्रमित असूनही व्हायरस शोधत नाही.
♦ खोट्या-नेगेटिव्ह रिपोर्टची कारणे म्हणजे चाचणीतील त्रुटी, नमुने गोळा करणे, चाचणी किटची अचूकता आणि वापरलेल्या डेंग्यू अँटीजेन आणि डेंग्यू अँटीबॉडीची गुणवत्ता असते.
♦डेंग्यूच्या चाचण्यांमध्ये रॅपिड डेंग्यू IgG अँटीबॉडी टेस्ट, रॅपिड डेंग्यू IgM अँटीबॉडी टेस्ट, डेंग्यू एलिसा(ELISA )टेस्ट, डेंग्यू फिव्हर एनएस 1(NS1) अँटीजेन टेस्ट आणि डेंग्यू आरटी-पीसीआर टेस्ट चा समावेश आहे
♦डेंग्यूवर कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत आणि लक्षणात्मक उपचारांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.