
बाळाला पाळणाघरामध्ये ठेवणं हे पालकांसाठी त्रासदायक असतं. बँगलोरमधील रहिवासी असलेल्या प्रिया साहा (32) यांना पाळणाघर ही एक गरज होती कारण त्यांना दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर कामावर परत जायचं होतं. त्यांनी जुलै 2019 मध्ये त्यांच्या मुलीची नोंदणी केली, जेव्हा ती 2 वर्षे 3 महिन्यांची होती. प्रिया म्हणतात, “यासाठी मी तिला सुमारे तीन महिने तयार केलं.” त्यांच्या मुलीला पाळणाघराची सवय व्हायला सुमारे दोन आठवडे लागले.
कर्नाटक कौन्सिल ऑफ प्रीस्कूलचे सचिव आणि अनुभवी शैक्षणिक सल्लागार पृथ्वी बनवासी सल्ला देतात, “घरासारखं असणारं पाळणाघर निवडा.” सुरळीत बदलासाठी, बाळाला पाळणाघरामध्ये घरी असल्यासारखं वाटलं पाहिजे, कारण तोपर्यंत ते फक्त त्यांच्या पालकांच्या आणि आजी-आजोबांच्या आसपास राहिलेले असतात.
याच्याशी सहमती दर्शवत, नागपूर, महाराष्ट्रातील पालक शिक्षक आणि कौटुंबिक सल्लागार हिमानी गुप्ते नमूद करतात, “पालकांनी हे सुनिश्चित केलं पाहिजे की वातावरण, संसाधनं तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मुलाला हाताळण्यासाठी प्रशिक्षित आहेत.” त्या पुढे म्हणतात, “पाळणाघर हे शाळेला पूरक आहे. त्यामुळे, पालकांनी त्यांच्या मुलासाठी पाळणाघर निवडताना शैक्षणिक वातावरणापेक्षा सामाजिक वातावरणाला प्राधान्य दिलं पाहिजे.”
तुम्ही तुमच्या बाळाला पाळणाघरांमध्ये कधी पाठवावं?
पाळणाघरामध्ये ठेवण्यासाठी लहान मुलांचे वय दीड वर्ष ते 12 किंवा 14 वर्षे (क्वचित प्रसंगी) असू शकते. डॉ. गुप्ते सांगतात, दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी, पाळणाघरामध्ये घालवलेला वेळ सामान्यत: मोठ्या मुलांच्या तुलनेत कमी असेल. त्या पुढे सांगतात, “मुलाने पाळणाघरामध्ये प्रवेश घेण्यापूर्वी मूलभूत संवाद शिकला पाहिजे.”
नॉर्विच, यूके येथील गृहिणी लॉरा एव्हिस (43) यांनी त्यांच्या बाळाला 2021 मध्ये पाळणाघरामध्ये दाखल केले जेव्हा तो 2 वर्षांचा होता. त्या आठवतात, “माझ्या मुलाची प्रगती हळूहळू होत होती. एक किंवा दोन तास पाळणाघरामध्ये राहिल्यानंतर, त्याने पूर्ण दिवस तिथे राहण्याची प्रगती केली.”
डॉ. राजलक्ष्मी, स्त्रीरोगतज्ञ, बाल मानसशास्त्रज्ञ आणि आरोग्य आणि भावना, कॅनाकोना, गोवाच्या संस्थापक, सुचवितात की मुलाला त्यांच्या पहिल्या दिवसापूर्वी भेटीसाठी पाळणाघरामध्ये घेऊन जाणं त्यांच्या अनुभवामध्ये लक्षणीय वाढ करू शकते. “मुलाला तयार केल्यानं नवीन वातावरणाचा धक्का टाळता येतो. मुलामध्ये हळूहळू वेगळेपणाची भावना आणणं महत्त्वाचं आहे,” ती म्हणते.
पाळणाघरामध्ये ठेवलेले बाळ: हा बदल कधीही सोपा नसतो
पाळणाघरात वातावरणाशी जुळवून घेणं लहान मुलासाठी आव्हानात्मक असू शकतं, कारण त्यांना हळूहळू नवीन वातावरणाची सवय होते. गुप्ते म्हणतात, “मुलाची तयारी आणि सोयीची पातळी महत्त्वाची आहे. एव्हिस हॅपीएस्ट हेल्थला सांगतात, “सुरुवातीच्या दिवसांमध्ये, माझ्या मुलाने मी त्याच्यासोबत राहण्याचा आग्रह धरला. परंतु, बेबी केअर सेंटरने मला आश्वासन दिलं की कालांतराने त्याला नवीन वातावरणाची सवय होईल.”
ओस्लो, नॉर्वे येथील संशोधकांनी केलेल्या 2021 च्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की घरापासून बालसंगोपनाकडे जाताना मूल जास्त कॉर्टिसॉल (स्ट्रेस हार्मोन) स्रावित करतं. जेव्हा ते त्यांच्या पालकांपासून वेगळे होतात तेव्हा तणाव खूप जास्त असतो आणि जेव्हा ते संध्याकाळी त्यांच्याशी पुन्हा एकत्र येतात तेव्हा लक्षणीयरीत्या कमी होतो.
प्रिया आठवतात की, त्यांची मुलगी जवळपास एक आठवडा रडायची. त्या पुढे सांगतात, “परंतु पंधरवड्यात तिने आनंदाने बाय केला. ते माझ्यासाठी आश्वासक होतं.”
याव्यतिरिक्त, मुलांना पाळणाघरामध्ये पाठवण्यामुळे पालकांच्या भावनिक हृदयावरही ताण येऊ शकतो. लॉरा म्हणततात की तिच्या मुलानं स्वतंत्र व्हावं आणि डेकेअरमध्ये मित्र बनवून आणि काही सोशियल स्किल्स (जसं शेअर करणं आणि काळजी घेणं) शिकून शाळेच्या वातावरणासाठी तयार व्हावं अशी त्यांची इच्छा होती. त्या म्हणतात, “तथापि, जेव्हा तो माझ्यासाठी दारात ओरडला तेव्हा निराश न होणं कठीण होतं.” त्या पुढे सांगतात, कर्मचार्यांनी दिवसभर आश्वासन देणारे मेसेज आणि फोटो पाठवले, ज्यामुळे मदत झाली.
तुमच्या मुलाला पाळणाघरामध्ये राहण्यासाठी कसं तयार करावं?
डॉ. गुप्ते स्पष्ट करतात, “पालक मुलाला मूलभूत वाक्यं बोलायला, स्वतः जेवायला आणि लघवीला जायला शिकवून तयार करू शकतात.” प्रिया म्हणतात की त्यांची मुलगी बेबी केअर सेंटरमध्ये नवीन भाषा शिकेल की नाही ही त्यांची चिंता होती, कारण तिला फक्त तिची मातृभाषा समजते. त्या पुढे सांगतात, “आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती नवीन इंग्रजी आणि कन्नड शब्द शिकून परत आली.”
बहुतेक पालकांना आणखी एक चिंता असते ती म्हणजे स्वच्छता आणि संसाधने. “मी तिला हाताची स्वच्छता, टिफिन बॉक्समधून अन्न खाणं आणि हे त्यांनी पाळणाघर सुरू करण्यापूर्वी महिनाभर आधी शिकवलं. प्रिया म्हणतात, “तथापि, तिला चटकदार खायची सवय असल्यानं, डेकेअर कर्मचार्यांनी तिच्या खाण्याच्या पद्धतींवर बारकाईनं नजर ठेवावी अशी माझी इच्छा होती.”
डॉ. गुप्ते सांगतात की, मुलांमध्ये जबाबदारीची जाणीव वाढण्यासाठी त्यांना स्वतःचा डबा, बॅग, पाण्याची बाटली यांची काळजी घ्यायला शिकवा यामुळे मुलांमध्ये स्वावलंबनाची भावना देखील वाढेल असे ते सांगतात.
मुलाला घरी असल्यासारखं आणि सुरक्षित वाटणे गरजेचे आहे
बनवासी म्हणतात की मुलाला नवीन वातावरणामध्ये आपलंस वाटलं पाहिजे. “पाळणाघर हे त्यांच्या घरासारखं असलं पाहिजे, जसं की मूल एखाद्या कौटुंबिक मित्राच्या घरी इतर मुलांबरोबर खेळण्यासाठी जात आहे.” याव्यतिरिक्त पाळणाघरात कर्मचाऱ्यांनी प्रत्येक मुलाच्या विशिष्ट गोष्टी समजून घेणेही महत्वाचे आहे.
डॉ. बनवासी हे पालकांना त्यांच्या मुलांच्या कपड्यांबद्दल आणि जेवणाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात, “त्या वयोगटातील मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते त्यामुळे त्यांना आरामदायक कपडे (जसं की ट्राउझर्स, शॉर्ट्स किंवा टी-शर्ट) आणि कमीत कमी दागिने मुलांच्या अंगावर ठेवा.” याशिवाय, पालकांनी त्यांच्या मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांना होणार गॅस्ट्रोएन्टेरिक संसर्ग टाळण्यासाठी आरोग्यदायी, ताजं शिजवलेल्या अन्नाचा डबा देणे गरजेचे आहे.”
डॉ. गुप्ते म्हणतात की, पाळणाघरामध्ये मुलांची नोंदणी करण्यापूर्वी पालकांनी काही घटकांचा विचार करणं गरजेचं आहे. यामध्ये लहान मुलांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाविषयी शिकवणं तसेच लहान मुलांची संख्या मर्यादित असलेल्या आणि सगळीकडे सिक्युरिटी कॅमेरे असलेल्या पाळणाघराची निवड करणे या गोष्टींचा समावेश आहे.
लक्षात ठेवायच्या गोष्टी
- पालकांनी त्यांच्या मुलांसाठी घरातले वातावरण असते अशी पाळणाघरे निवडली पाहिजेत. याव्यतिरिक्त मुलांना सांभाळण्यासाठी पाळणाघरातील कर्मचारी हे प्रशिक्षित आहेत याची पालकांनी खात्री करणे गरजेचे आहे.
- पालकांनी त्यांच्या मुलांना साधे संवाद, स्वतः जेवणे आणि शी-शू करण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे आणि त्यानंतर पाळणाघरात पाठवले पाहिजे.
- पालकांनी त्यांच्या मुलांच्या कपड्यांबद्दल आणि आहाराबद्दल सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. मुलांना सुटसुटीत कपडे आणि ताजा सकस आहार मिळेल याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.