
दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो. भारतातसह जगभरात दिवाळीचा सण मोठ्या जल्लोषात आणि आनंदात साजरा केला जातो. दसऱ्यानंतर येणारी दिवाळी सणासुदीने भरलेली असते. दिवाळी सनात दिव्यांची रांग, आकाशकंदील, आठवडाभर फटाके, मिठाई, कुटुंबासाठी आनंदाचे क्षण अशी दिवाळी साजरी केली जाते. हा सण रोषणाई आणि फटाक्यांच्या आतषबाजीने साजरा केला जातो. हा सण आपण पूर्वीप्रमाणेच परंपरेने साजरा तर करतोच, पण आधुनिक जगाला आवश्यक असलेल्या बदलांसह तो साजरा करतो. तर यंदाच्या दिवाळीसाठी आवश्यक ती तयारी तुम्ही केली आहे का? कोणते पदार्थ तयार करावेत? कोणाला निमंत्रित करावे? सेलिब्रेशन कसे करावे याची संपूर्ण यादी आपल्याकडे असणे खूप महत्वाचे आहे. पण यावेळी हॅपिएस्ट हेल्थ तुमच्यासाठी एक सोप्प्या आणि सहज ठेवता येणाऱ्या घरच्या ‘दिवाळी कीट’ बद्दल माहिती देत आहे.
इतर कोणत्याही सणापेक्षा हा सण साजरा करताना आपल्याला अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. लहान मुले असलेल्या घरात दिवे लावताना भाजणे, मुले खेळताना पडून किंवा इतर प्रकारे झालेल्या जखमा आणि वृद्ध घरात असताना घ्यावयाची खबरदारी, फटाके पेटवताना जळण्याचा धोका,असे अनेक अपघात होऊ शकतात. असे अनेपेक्षित अपघात घडल्यास सणासुदीच्या काळात आवश्यक असलेल्या गोष्टी शोधणे सोप्पे काम नसते. अश्यावेळी तुमच्या घरात आधीपासूनच या सर्व गोष्टींचे एक बॉक्स असल्यास किती चांगले होईल. यासाठी दिवाळीची ही खास तयारी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला काही अति भयानक घडण्यापासून वाचवू शकते. म्हणूनचं चला पाहूया
‘हॅप्पीएस्ट हेल्थ दिवाळी कीट’ – बॉक्समध्ये गोळा कराव्या लागणाऱ्या गोष्टी:
जळण्यावर उपचार:
दिवे लावताना, फटाके फोडताना इजा होण्याची शक्यता असते. किरकोळ जळजळ होण्यासाठी कोणत्याही मोठ्या उपचारांची आवश्यकता नसते यासाठी घरात असलेले सिल्व्हर सल्फाडायझिन लावणे पुरेसे आहे, असे कुमार, (असोसिएशन ऑफ इमर्जन्सी फिजिशियन्स ऑफ इंडियाचे सदस्य) डॉ. सुधाकर सांगतात. फटाके लावताना अचानक थोडे भाजल्यास भाजलेला भाग थंड करण्यासाठी पाण्यात किवा नळाखाली १५ ते २० मिनिटे ठेवावा. यासाठी आधीच एक घरात भरलेली पाण्याची बादली भरलेली ठेवणे. तसेच, प्राथमिक उपचारांसाठी सिल्व्हर सल्फाडायझिन, कोरफड जेल आणि अँटीसेप्टिक क्रीम आपल्या बॉक्समध्ये ठेवा.
ध्वनी प्रदूषण:
शहरी भागासह देशाच्या सर्वच भागात सणासुदीच्या काळात निर्माण होणाऱ्या आवाजामुळे लहान मुले आणि वृद्धांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सणासुदीच्या काळात आपण या सर्व आवाजांपासून वाचू शकत नसलो तरी खबरदारीचा उपाय म्हणून अतिध्वनीप्रदूषनाचा उपाय म्हणून कानात कापसाचे गोळे वापरू शकता आणि इयरप्लग घालू शकता. यासाठी ते या बॉक्समध्ये ठेवा.
फटाके फोडताना आवश्यक खबरदारी:
हातमोजे: फटाके फोडण्यापूर्वी आवश्यक असल्यास हातमोजे घाला. डोळ्यांचे संरक्षण फटाके फोडताना संरक्षक गॉगल वापरणे आणि डोळ्यांसाठी लागणारे आय डॉप्स अगोदरच या बॉक्समध्ये ठेवा. शक्यतो सुती कपडे घाला.
प्राथमिक प्रथमोपचार:
या बॉक्समध्ये बँड-एड, गॉज आणि प्लास्टर नक्की ठेवा. दुखापत झाल्यास पुसण्यासाठी लागणारा कापूस, कात्री आणि जखमेवर लावण्यासाठी पावडर ठेवा. डोकेदुखी, ताप आल्यावर लागणारी औषधे म्हणजेच पेनकिलर ठेवणे विसरू नका. आपण नियमितपणे वापरत असलेल्या औषधांचा देखील अतिरिक्त साठा ठेवा.
महत्वाचे नंबर:
सणादरम्यान अनेपेक्षित काही अपघात घडल्यास त्वरित मदत मिळविण्यासाठी या बॉक्समध्ये फोन नंबरची यादी ठेवा. या यादीत तुमचे फॅमिली डॉक्टर, आजूबाजूच्या रुग्णालयांचा नंबर, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेडचे नंबर लिहून ठेवा.
बोध:
दिवाळीत अनेपेक्षित अपघात दुखावत होण्याची शक्यता असते. पहिल्या टप्प्यात ते रोखण्यासाठी आपण प्रयत्न करू शकता.
फटाके फोडण्यापूर्वी संरक्षक चष्मा घाला
प्राथमिक उपचारासाठी लागणारे बँड-एड, गॉज आणि प्लास्टर, कापूस, कात्री आणि जखमी झाल्यावर पुसण्यासाठी लागणारी जखमेची पावडर बॉक्समध्ये ठेवा .
कोणत्याही आणीबाणीसाठी लागणारे फोन नंबर अगोदरच लिहून एक यादी तयार करून बॉक्समध्ये ठेवा.