
दिवाळीचा सण जसजसा जवळ येतो तसतसे आपल्याला करावयाच्या गोष्टींची यादी मोठी होत जाते. सणासुदीसाठी लागणारे साहित्य, वेगवेगळे पदार्थ, घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तू, भेटवस्तू, नवीन कपड्यांची खरेदी. दिवाळी 2023 च्या या व्यापक चेकलिस्टमध्ये, आपली त्वचा चमकण्यासाठी सुद्धा आपण वेगवेगळे प्रयत्न करतो आणि महागड्या आणि अनुभव नसलेल्या सलून पद्धतींचा अवलंब करतो. पण जर आम्ही तुम्हाला त्वचा खराब न करता ती चमक मिळवण्याच्या सर्वात सोप्या मार्गांबद्दल सांगितले तर? या दिवाळी सिजनमध्ये निरोगी आणि चमकदार त्वचा टिकवून ठेवण्यासाठी हॅपिएस्ट हेल्थ तुमच्यासोबत तज्ञांनी दिलेल्या टिप्स शेअर करत आहे.
दिवाळी सनात उद्भवणाऱ्या त्वचेच्या समस्या
बेंगळुरूयेथील डॉ. मिकी सिंग यांच्या मते दिवाळीमध्ये मेकअपचा अति वापर केल्याने आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्याने आणि कोरड्या हवामानामुळे कोरडी आणि डिहायड्रेटेड त्वचा निर्माण होते. मेकअप उत्पादनांमध्ये असलेल्या रसायनांच्या धोक्यामुळे त्वचेची अॅलर्जी देखील उद्भवू शकते. डॉ. लीलावती सांगतात की, मिठाईचे जास्त सेवन, पर्यावरण प्रदूषण आणि धुराच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास त्वचेचा टोन असमान होऊ शकतो आणि मुरुमांच्या ब्रेकआऊटला कारणीभूत ठरू शकते.
तज्ञांचा सल्ला
डॉ. लीलावती आठवड्यातून एकदा हायड्रा मेडिफेशियल सारख्या फेशियलचा समावेश करण्याची शिफारस करतात. प्रदूषणाच्या परिणामांचा सामना करण्यासाठी व्हिटॅमिन सी सारख्या अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध त्वचेची काळजी घेणारी उत्पादने वापरण्याचा सल्ला त्या देतात. तुमच्याकडे रात्रीची स्किनकेअर रूटीन ठेवणे. तरच त्वचेची दुरुस्ती होईल. त्वचेचे पीएच संतुलन राखण्यासाठी अल्कोहोल-मुक्त टोनरसह चांगले हायड्रेटिंग सीरम किंवा तेल वापरण्याचा सल्ला त्या देतात. त्या म्हणतात जास्त मेकअप केल्याने छिद्रे ब्लॉक होतात आणि ब्रेकआऊट किंवा त्वचेची जळजळ होते.
नियमित काळजी घ्या:
फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि वारंवार मेकअप केल्याने घाण आणि अशुद्धीपासून मुक्त होण्यासाठी दिवसातून किमान दोनवेळा चेहरा स्वच्छ करणे आवश्यक आहे.
हायड्रेटेड राहा: त्वचेला आतून हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. आपल्या त्वचेच्या प्रकाराला साजेसे चांगल्या प्रतीचे मॉइश्चरायझर वापरा. हायड्रेटिंग आणि मॉइश्चरायझिंग उत्पादने ज्यात सिरामाइड्स, हायल्युरोनिक आम्ल, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असतात त्यामुळे त्यांची शिफारस केली जाते.
उन्हापासून सावधान: जर आपण दिवसा बाहेर जात असाल तर हानिकारक अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ब्रॉड-स्पेक्ट्रम सनस्क्रीन वापरा.
एक्सफोलिएट (स्क्रब): त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्यासाठी आणि त्वचेच्या पुनरुज्जीवनास प्रोत्साहित करण्यासाठी आठवड्यातून एकदा किंवा दोनदा सौम्य रब आणि काढून टाकण्याची प्रक्रिया वापरा. आठवड्यातून एकदा फेस मास्क लावावा.
चमकदार त्वचेसाठी तज्ञांच्या शिफारशी
- नवीन उत्पादने वापरण्यापूर्वी पॅच चाचणी करा.
- नॉन-कॉमेडोजेनिक मेकअप निवडा आणि कॉमेडोजेनिक स्किनकेअर उत्पादने टाळा.
- सौम्य मेकअप रिमूव्हर वापरुन, झोपण्यापूर्वी मेकअप काढून टाका.
- सातत्यपूर्ण स्किनकेअर रूटीन ठेवा.
- हलका मेकअप निवडा आणि नेहमी झोपण्यापूर्वी काढून टाका.
- मेकअप ब्रश आणि स्पंज नियमितपणे स्वच्छ करा.
- आपल्याकडे त्वचेवर काही प्रतिकूल प्रतिक्रिया असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.
त्वचा चमकदार बनवणारा आहार
डॉ. लीलावती चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आहाराचे महत्त्व अधोरेखित करतात. त्या त्वचेसाठी अनुकूल पदार्थ सुचवतात जसे की:
लिंबूवर्गीय फळे (संत्री, बेरी आणि लिंबू)
पौष्टिक-समृद्ध शेंगदाणे (बदाम आणि अक्रोड)
विविध प्रकारच्या भाज्या
- मध
- पौष्टिक नारळाचे पाण
- प्रथिन समृद्ध अंडी
त्वचेचे आरोग्य वाढवण्यासाठी जंक फूड, तळलेले पदार्थ आणि जास्त गोड पदार्थ कमी करण्याचा किंवा टाळण्याचा सल्ला देतात. आहाराच्या निवडी व्यतिरिक्त, डॉ. लीलावती नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि संतुलित जेवण घेण्याचा सल्ला देतात. त्या म्हणतात की हे घटक एकत्रितपणे निरोगी, चमकदार त्वचा राखण्यासाठी योगदान देतात.
व्हिडीओद्वारे माहिती मिळवा