
केस गळणे (अलोपेसिया) हे आंशिक किंवा पूर्ण, कायमचे किंवा तात्पुरते असू शकते आणि केवळ डोक्याशी संबंधित किंवा संपूर्ण शरीरासाठी असू शकते. ही स्थिती सामान्यतः हळूहळू वाढते आणि आनुवंशिकतेमुळे, हार्मोनच्या बदलांमुळे किंवा उद्भवलेल्या वैद्यकीय परिस्थितीमुळे आणि/किंवा त्यांच्या उपचारांमुळे निर्माण होते.
कसे ओळखावे
केस गळणे हे टाळूवरील केस जाणे किंवा त्याशिवाय केस गळणे किंवा टक्कल पडणे, पुरुष आणि स्त्री दोघांमध्येही केस गळतीची लक्षणे दिसू शकतात, परंतु पुरुषांमध्ये ही लक्षणे अधिक सामान्य आहे. सामान्यतः डोक्यावरील ५० ते १०० केस गळणे सामान्य आहे परंतु याचे प्रमाण वेगवेगळ्या घटकांमुळे वाढू शकते.
कारणे
केसगळतीची कारणे प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकतात आणि अनेकदा अनेक अंतर्निहित समस्या असतात केस गळण्याचे प्रमाण वाढते. यापैकी काही घटक पुढील प्रमाणे आहेत:
- वडिलांकडून किंवा आईकडून आलेली अनुवंशिकता.
- उवा किंवा लिखांच्या प्रादुर्भावामुळे टाळूला खाज सुटते आणि जळजळ होते.
- लोहाची कमतरता किंवा थायरॉईड यांमुळे बिघडलेले कार्य आणि त्यामुळे अशक्तपणा येतो.
- डोक्यातील कोंडा किंवा टाळूला झालेले संक्रमण (बुरशीजन्य)
- खाण्यातील विकारांमुळे जसे एनोरेक्सिया, बुलिमिया किंवा आहारातील प्रोटीनची कमतरता यांमुळे होते.
- रक्त पातळ करणाऱ्या औषधांचा वापर, गर्भनिरोधक गोळ्या, अ जीवनसत्व पूरक गोळ्या यांचा वापर.
- तणाव, केसांसाठी सौंदर्य प्रसाधने, अचानक केलेले बदल यांसारख्या जीवनशैलीच्या समस्यांमुळे समस्या उद्भवते.
निदान करणे आणि प्रतिबंध करणे
डर्मेटोलॉजिस्टस किंवा सामान्य चिकित्सक हे सहसा तुमचा वैद्यकीय इतिहास, कौटुंबिक इतिहास विचारून किंवा तुमच्या टाळूची स्थिती पाहून तुमच्या केसगळतीचे निदान आणि उपचार करतात. सामान्यतः चालू असलेल्या वैद्यकीय स्थितीमुळे केस गळणे हे तात्पुरते असते आणि केस पुन्हा येणे सुरू झाल्यावर ते स्वतःच वाढतात, परंतु इतर प्रकरणांमध्ये वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यक भासू शकते.
उपचार
टक्कल पडण्याची किंवा केसगळतीची बहुतेक केसेस या अनुवांशिक असतात आणि म्हणून त्यावर उपचार करता येत नाहीत, परंतु केस गळती टाळण्यासाठी, त्यावर उपचार करण्यासाठी किंवा विलंब करण्यासाठी काही उपाय आहेत. त्यापैकी काही उपचार हे खाली दिलेले आहेत:
- पुरुषांमधील केस गळतीवर उपचार करण्यासाठी Finasteride हे औषध दिले जाते. ते स्त्रिया किंवा मुले यांच्यासाठी दिले जात नाही.
- मिनोक्सिडिल हे एक सहज मिळणारे औषध आहे जे विशिष्ट पद्धतीने गळणाऱ्या केसांसाठी उपचार म्हणून दिले जाते आणि ते पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठीही वापरू शकतात.
- केस गळतीवर उपचार करण्यासाठी केस प्रत्यारोपण, स्कॅल्प रिडक्शन आणि एक्स्पान्शन आणि विग यासारख्या प्रक्रियांचा वापर केला जातो.
वरील उपायांव्यतिरिक्त, केसगळतीमुळे व्यथित झालेल्या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी वैद्यकीय आरोग्य व्यावसायिक समुपदेशन करू शकतात. एखाद्या व्यक्तीला समाधानी आणि आनंदी वाटण्यास मदत करण्यासाठी हे एक उत्तम साधन असू शकते.