728X90

728X90

0

0

0

0

0

0

0

0

0

या लेखात

[shortcode_change_breadcrumb]
Obesity And Breathlessness: दुर्लक्ष करू नका! लठ्ठपणा आणि धाप लागणे
82

Obesity And Breathlessness: दुर्लक्ष करू नका! लठ्ठपणा आणि धाप लागणे

तुमच्या छातीच्या झडपांवर अतिरिक्त चरबी साठल्याने श्वसनसंस्थेवर दबाव येऊ शकतो ज्याचा परिणाम श्वासोच्छवासावर होतो. वजनावर नियंत्रण आणि जीवनशैलीत बदल या गोष्टींची मदत होऊ शकते.
लठ्ठपणा आणि धाप लागणे
लठ्ठपणा आणि धाप लागणे

लठ्ठपणा आणि श्वासोच्छवासाचा त्रास यांचा अनेकदा परस्पर संबंध असतो. तथापि, शरीराचे हे अतिरिक्त वजन ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम (ओएचएस) नावाच्या समस्येमधून तुमच्या श्वासोच्छवासावर परिणाम करतात. तुमच्या छातीच्या झडपांवर जास्त चरबी जमा झाल्यामुळे श्वसनसंस्थेवर प्रामुख्याने फुफ्फुसांवर दबाव येतो. यामुळे तुमच्या श्वासोच्छवासावर गंभीर परिणाम होतो आणि अखेरीस तुमच्या रक्तात कार्बन डायऑक्साइड तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. वैद्यकीय क्षेत्रामध्ये पिकविकियन सिंड्रोम म्हणून प्रसिद्ध असलेल्या या प्रकारत चार्ल्स डिकन्सच्या द पिकविक पेपर्समधील जोएची आठवण होते, जो अति लठ्ठपणा आणि गंभीर निद्रानाश या समस्यांसह ओएचएस असलेल्या व्यक्तींनी अनुभवलेली सामान्य लक्षणे दाखवतो.

नारायणा हेल्थ सिटी,  मुझुमदार शॉ मेडिकल सेंटर येथील अंतर्गत औषध, पल्मोनोलॉजीचे सल्लागार डॉ रविचंद्र एमआरके हे ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोमची व्याख्या तीन घटकांची त्रिसूत्री स्वरूपात करतात – लठ्ठपणा (छातीच्या झडपांवर जास्त चरबी जमा होणे), हायपरकॅपनिया (अतिरिक्त कार्बन डायऑक्साइडयुक्त रक्त) आणि झोपेत श्वासोच्छवासात येणारा अडथळा.

“ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम हा फुफ्फुसाचा विकार नाही” असे डॉ चंद्रा हे स्पष्टपणे नमूद करतात. ही एक सिस्टीमिक डिसऑर्डर आहे आणि त्याचे मूळ कारण लठ्ठपणा हे आहे, ज्याचा मानवी शरीराच्या फुफ्फुसांवर आणि इतर अवयवांवर परिणाम होतो असे ते सांगतात.

ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम (Obesity hypoventilation syndrome) OHS म्हणजे काय? 

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील मणिपाल हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजिस्ट डॉ गिरीधर अडपा स्पष्ट सांगतात की, “ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम अशावेळी होतो जेव्हा शरीराच्या वजनामुळे छातीच्या झडपांवर दाब येतो आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांना सामान्यपणे श्वास घेणे कठीण जाते. पिकविकियन सिंड्रोम हा हायपरकॅपनियाशी संबंधित आहे.”

ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम कशामुळे होतो?

डॉ चंद्रा सांगतात की, लठ्ठपणामुळे छातीच्या झडपांवर चरबी जमा होते. यामुळे छातीवरील दाब वाढतो आणि श्वास घेताना योग्य प्रकारे विस्तारण्याची क्षमता कमी होते.”

चरबी जमा झाल्यामुळे छातीच्या झडपा जड होतात आणि हायपोव्हेंटिलेशन होते. परिणामी, जेव्हा व्यक्ती श्वासोच्छ्वास करणायचा प्रयत्न करतात तेव्हा छातीची झडप प्रभावीपणे कार्य करत नाही.  यामुळे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते. कालांतराने, कार्बन डायऑक्साईडची पातळी वाढते ज्यामुळे रक्तातील आम्लाचे प्रमाण वाढते.

यापुढे ते सांगतात की, ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोममुळे वजन वाढू शकते. जेव्हा रक्तामधील आम्लाचे प्रमाण वाढते तेव्हा शरीर इन्सुलिन आणि लेप्टिन सारख्या हॉर्मोन्सना प्रतिबंध करते. लेप्टिन हॉर्मोन्स हे भूक नियंत्रित करण्यास मदत करते; पण लेप्टिनच्या प्रतिबंधामध्ये ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम असलेल्या व्यक्ती कधीच भूक शमण्यापर्यंत पोहोचत नाहीत ज्यामुळे परिणामी अतिरिक्त अन्न सेवन होते.

पिकविकियन सिंड्रोमची लक्षणे

तुमच्या रक्तातील कार्बन डायऑक्साईडच्या पातळीची वाढण्याचे लक्षण म्हणजे विशेषतः सकाळी प्रचंड डोकेदुखी असू शकते असे डॉ. चंद्रा म्हणतात. “झोपेचा विकार असलेल्यांना झोपेत श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो,” असे ते  पुढे सांगतात.

डॉ. अडापा म्हणतात की, ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींचा बीएमआय 30 पेक्षा जास्त असतो आणि कंबर-नितंब यांचा आकार मोठा असतो. ते पुढे सांगतात की, पिकविकियन सिंड्रोम असलेल्या व्यक्तींमध्ये झोपेमध्ये श्वसनक्रियेमध्ये अडथळा येणे, अत्यंत झोप येणे, धाप लागणे आणि तीव्र घोरणे ही सामान्य लक्षणे दिसून येतात.

OHS ही गंभीर स्थिती आहे का?

ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोममध्ये शरीराच्या पचनक्रियेवर अत्यंत ताण पडतो. हृदय आणि मेंदूला काम करण्यासाठी सतत ऑक्सिजनच्या उच्च पातळीची आवश्यकता असते आणि  या स्थितीमुळे हायपोक्सिक तणाव (कमी ऑक्सिजन पातळी)वाढून हृदयावर ताण येतो ज्यामुळे हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो असे डॉ. चंद्रा स्पष्ट करतात.

डॉ. अडापा म्हणतात की, OHS वर उपचार न केल्यास फुफ्फुसाच्या उच्च रक्तदाबाचा त्रास होतो ज्यामुळे हृदयाची उजवी बाजू बंद होण्याचा धोका वाढतो.

ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोमचे व्यवस्थापन

डॉ. अडापा सांगतात की, पिकविकियन सिंड्रोमचा धोका टाळण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काम करणे.

डॉ चंद्रा यांच्या मते, उच्च BMI असलेल्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे, जसे की व्यायामाची दिनचर्या, विश्रांतीसाठी पुरेशी शांत झोप, आहारावर नियंत्रण ठेवणे आणि सकस आहाराच्या नियोजनासाठी आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांचा सल्ला घेणे यासारखे पर्याय निवडणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणतात की, श्वासोच्छवासासाठी CPAP मशीनद्वारे मदत घेतल्यास रात्री झोपेमध्ये ऑक्सिजन पुरेशी पातळी राखण्यास मदत होते. यामध्ये झोपेच्या वेळी नाक आणि तोंडावर मास्क घातले पाहिजे. CPAP मशिनला मास्क जोडलेला असतो जो OHS असलेल्या व्यक्तींच्या श्वासोच्छवासावर लक्ष ठेवतो आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यासाठी हवेचा दाब निर्माण करून झोपेची गुणवत्ता सुधारण्यात मदत करतो.

ओबेसिटी हायपोव्हेंटिलेशन सिंड्रोम किंवा पिकविकियन सिंड्रोम ही एक गंभीर समस्या आहे जी जास्त वजन आणि श्वासोच्छवासाशी संबंधित झोपेच्या विकारांमुळे उद्भवते.परंतू जीवनशैलीत बदल करून वजन नियंत्रणात ठेवल्यास जोखीम कमी होण्यास मदत होते.

 

 

तुमचा अनुभव/कमेंट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ट्रेडिंग

लेख

लेख
भारत हा विविधतेचा देश आहे आणि भारतात जेवढे सण साजरे केले जातात ते इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत अतुलनीय आहेत.
लेख
केस कापल्यास लवकर वाढतील, एक केस पांढरा झाला कि बाकीचे केस पांढरे होतात, रोज केस धुवू नयेत. हे सगळं खरं आहे का?
लेख
तज्ञांच्या म्हणण्यानुसार जेवल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. छातीत जळजळ आणि अपचन यासारख्या समस्या टाळण्यासाठी हे करा
लेख
सायकल चालविणे आणि चालणे या दोन्ही हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी क्रिया आहेत ज्या वजन कमी करण्यास मदत करतात आणि आरोग्याचे  विविध आजार दूर ठेवतात.
लेख
थायरॉईड  शरीरातील आवश्यक आणि महत्त्वपूर्ण रसायने बनवण्यास मदत करते.  ही रसायने आपल्या शरीरातील अनेक महत्त्वाच्या कामांवर नियंत्रण ठेवतात.
लेख
आपल्या चटणीतील लसूण आपले रक्ताभिसरण आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते. हे वजन कमी करण्यास मदत करते

0

0

0

0

0

0

0

0

0

Opt-in To Our Daily Newsletter

* Please check your Spam folder for the Opt-in confirmation mail

Opt-in To Our
Daily Newsletter

We use cookies to customize your user experience, view our policy here

तुमची प्रतिक्रिया यशस्वीरित्या सबमिट केली गेली

हॅपीएस्ट हेल्थ टीम तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल.